Ramdas Kadam :...अन्यथा मी मुख्यमंत्री झालो असतो; रामदास कदमांनी एकनाथ शिंदेंच्या समोरच सांगितलं

Ratnagiri News : ''मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उठतात कधी, झोपतात कधी हे कळत नाही, कारण ते रात्रंदिवस काम करतात''
Ramdas Kadam
Ramdas KadamSarkarnama

Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज (दि.19 मार्च) खेडमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी शिवसेनेचे (शिंदे गट) नेते रामदास कदम बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

रामदास कदम म्हणाले, ''मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उठतात कधी, झोपतात कधी हे देखील कळत नाही, कारण ते रात्रंदिवस काम करतात. माशाच्या पिल्लाला पोहायला शिकावं लागत नाही. हे योगेश कदम यांनी दाखवून दिलं''.

''बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला. एवढंच उद्धव ठाकरे हे खरं बोलत आहेत. अन्यथा ते सर्व खोट बोलत आहेत. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते ज्या दिवशी शिवसेना ही काँग्रेससोबत जाईल, त्या दिवशी शिवसेना बंद करेल. मग आता उद्धव ठाकरे यांनी वडीलांचा आपमान केला. उद्धव ठाकरे यावर का बोलत नाहीत'', असा सवाल त्यांनी केला.

Ramdas Kadam
Konkan News : योगेश कदमांना संपवण्याचे कसे प्रयत्न झाले, त्याचा साक्षीदार; उदय सामंतांनी सगळंच सांगितलं

''आजची सभा ही त्यांनी पाहावी. शिवाजी पार्क मैदानही कमी पडलं असतं. पण याआधीही शिवसेना कुणाची मोठी आहे हे दसऱ्यांच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी दाखवून दिलं आहे''.

''२००९ मध्ये तुम्ही (उद्धव ठाकरे यांनी) गुहागर मधून मला तिकीट दिलं. पण मी दापोलीतून मागितलं होतं. पण तिथे मला तुम्ही आपल्याच एका नेत्याला सांगून पाडलं. कशासाठी तुम्हाला त्यावेळी मुख्यमंत्री व्हायचं होतं. पण राज्याचा विरोधीपक्ष नेता हा राज्याचा पुढचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार असतो. कदाचीत बाळासाहे ठाकरे यांनी मला मुख्यमंत्री केलं असतं. पण मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून तुम्ही मला पाडलं. मला जाधव काय निवडणुकीत पाडतो. असे शंभर भास्कर जाधव मी खिशात घेऊन फिरतो'', असं रामदास कदम यावेळी म्हणाले.

Ramdas Kadam
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंच्या सभेत लावरे 'तो' व्हिडीओ; उद्धव ठाकरेंचे व्हिडीओ अन्...

''उद्धव ठाकरे हे एक वर्षभर मला गाडीत घेतल्याशिवाय गाडीत बसत नव्हते. पण नंतर उद्धव ठाकरे मला चार वर्ष भेटले नाहीत. त्याच कारण काय होतं हे तरी त्यांनी सांगावं ना. आता उद्धव ठाकरे हे सुभाष देसाईंना बरोबर घेऊन फिरतात''.

''पण बाळासाहेब ठाकरे हे रामदास कदम सारख्या वाघाला संभाळत होते. आता उद्धव ठाकरे हे सुभाष देसाई यांच्या सारख्या शेळ्या-मेंढ्यांना संभाळतात'', असा घणाघात रामदास कदम यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com