जयंत पाटलांचा अलिबागच्या विकासात खोडा : शिवसेना आमदार दळवींचा हल्लाबोल

शेकापचे आमदार पाटील यांनी नेहमीच येथील पाणी प्रश्न सुटू नये, यासाठीच प्रयत्न केले आहेत.
Mahendra Dalvi
Mahendra Dalvisarkarnama

रायगड : अलिबाग तालुक्याच्या विकास कामांमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील (jayant patil) यांनी नेहमीच खोडा घातला आहे. मिळकत खारसह तालुक्यातील पाणीप्रश्न न सोडविता अधिकाऱ्यांना हाताशी धरून तो अधांतरीत कसा राहील, यातच आमदार जयंत पाटील यांनी धन्यता मानली आहे, असा आरोप शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांनी आमदार पाटील यांच्यावर केला. त्यामुळे अलिबागमध्ये शिवसेना आणि शेकाप यांच्यात पुन्हा कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. (Obstacles in the development work of Alibag from PWP MLA Jayant Patil : MLA Mahendra Dalvi)

Mahendra Dalvi
लतादीदींच्या स्वरमयी प्रवासाचे सोलापूर कनेक्शन...

अलिबाग तालुक्यातील मिळकत खार येथील जलजीवन मिशन अंतर्गत सरळ घोळ विहीर नळ जोडणी प्रकल्पाचे काम आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेले आहे. या कामाचा प्रारंभ आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी आमदार दळवी यांनी शेकापचे आमदार जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

Mahendra Dalvi
काॅंग्रेस नगरसेवकाला अटक होताच आमदार प्रज्ञा सातव पोलीस ठाण्यात धडकल्या

अलिबाग तालुक्यातील रेवस भागातील नागरिक हे पाणी टंचाईने अनेक वर्षे त्रस्त आहेत. मात्र, शेतकरी कामगार पक्षाची सत्ता अनेक वर्षे असताना येथील पाणी प्रश्न सोडविण्यात ते अपयशी ठरली आहेत. शेकापचे आमदार पाटील यांनी नेहमीच येथील पाणी प्रश्न सुटू नये, यासाठीच प्रयत्न केले आहेत, त्यामुळे आजही अलिबागचा विकास शेकापमुळे रखडला आहे. त्याचबरोबर चेंढरे ग्रामपंचायत हद्दीत बांधण्यात आलेले नाट्यगृह हे अलिबाग शहरासाठी होते. राज्य सरकारकडून साडेचार कोटी निधी प्राप्त करून घेऊन त्यातही भ्रष्टाचार केला आहे, असाही आरोप आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com