Bharat Gogawale News : मंत्रिपदासाठी भरत गोगावले अधीर; ‘कपडे तयार ठेवलेत, आता फक्त शपथविधी सोहळ्याची वाट बघतोय’

शिवराज्यभिषेक सोहळा दिनाच्या अगोदर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं आमचं मन आम्हाला सांगतंय.
Bharat Gogawale
Bharat Gogawale Sarkarnama

Mumbai : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या आठ दिवसांत होणे अपेक्षित आहे, ती वेळ आता जवळ येऊन ठेपली आहे. शपथविधीसाठी कपडे तयार ठेवले आहेत, आम्ही फक्त आता शपथविधी सोहळ्याची वाट बघतोय, अशा शब्दांत शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाष्य केले. (Now just waiting for the swearing-in ceremony : Bharat Gogawale)

रायगड जिल्ह्यातील रायगड (Raigad) किल्ल्यावर शिवराज्यभिषेक दिन सोहळा भव्यदिव्य करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या शिवराज्यभिषेक सोहळा दिनाच्या अगोदर मंत्रीमंडळ विस्तार (Cabinet expansion) झाला, तर मला रायगडचा पालकमंत्री म्हणून सोहळ्याला जाण्याची संधी नक्की मिळेल. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही तरी शिवराज्यभिषेक सोहळा धुमधडक्यातच साजरा केला जाणार आहे, असेही गोगावले यांनी स्पष्ट केले.

Bharat Gogawale
Maharashtra Politics: फडणवीसांचे निकटवर्तीय प्रवीण दरेकरांवर भाजपने सोपवली महत्वाची जबाबदारी!

शिवराज्यभिषेक सोहळा दिनाच्या अगोदर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं आमचं मन आम्हाला सांगतंय. मंत्रिमंडळाचा विस्तार होणं अपेक्षित आहे, असे सांगून भरत गोगावले (Bharat Gogawale) म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे मंत्रीपद देतील, त्या पदाच्या माध्यमातून आम्ही काम करणार आहे. काम करणाऱ्याला मरण नाही. काम करणारा कसंही आणि कुठेही काम करत असतो अन्‌ तो पुढं येत असतो.

Bharat Gogawale
Mangalveda Bazar Samiti: मंगळवेढ्यात काकानंतर पुतण्याला संधी; बाजार समिती सभापतीपदी सुशील आवताडे बिनविरोध

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो काही मंत्रिपदाचा भार आमच्यावर देतील, ते घेऊ आणि अख्ख्या महाराष्ट्रभर फिरू. शपथविधीसाठी कपडे तयार करून ठेवले आहेत, आम्ही फक्त आता शपथविधी सोहळ्याची वाट बघतोय, असेही आमदार गोगावले यांनी सांगितले.

बच्चू कडू काय म्हणाले?

जेवणाचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नसतं. घोडाबाजार आत जवळच आहे. मंत्री नसलो तरी सध्या आम्ही काम करतच आहोत. मंत्री असल्यावर आम्ही काम करतो का? मंत्री नसलो तरी अधिक वेगाने काम करत राहू. मंत्रीपदाची आम्हाला लालचा नाही. पण, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे. कुणालाही मंत्री करा; पण विस्तार होणे गरजेचे आहे, अशी भावना माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर व्यक्त केली.

Bharat Gogawale
Akluj Bazar Samiti : अकलूजमध्ये पुन्हा मोहिते पाटील; मदनसिंहांकडे सलग चौथ्यांदा बाजार समितीची धुरा; पांढरेंना एकनिष्ठेचे फळ

प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री मिळावा, अशी जनतेची मागणी आहे. त्यासंदर्भात शिंदे सरकार निश्चितच विचार करेल आणि मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार करेल, असे मला वाटते, असेही बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com