Nitesh Rane vs Uddhav Thackeray : नितेश राणेंचा कोकणात उद्धव ठाकरेंना धक्का; 'येथील' नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

Thackery Group and BJP : ठाकरे गटातील तीन नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश
Uddhav Thackeray, Nitesh Rane
Uddhav Thackeray, Nitesh RaneSarkarnama

Maharashtra Politics : राज्यात सत्ताबदलानंतरच्या दहा महिन्यांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि सत्ताधारी शिवसेना यांच्या आरोप-प्रत्यारोपींनी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच या दोन्ही शिवसेनेत एकमेकांच्या नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आपल्या गोटात ओढण्यासाठी रस्सीखेच सुरू असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, भाजप नेतेही ठाकरे गटाला धक्के देताना दिसत आहेत.

कोकणातील सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यामधील वैभववाडीत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मोठा धक्का दिला आहे. वैभववाडीतील ठाकरे गटाचे तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वैभववाडी नगरपंचायतीवर भाजपचीच सत्ता आहे. दरम्यान, येथे ठाकरे गटाचे पाच नगरसेवक होते. त्यातील तीन नगरसेवकांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे वैभववाडीत हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

१७ जागा असलेल्या वैभववाडी नगरपंचायतची जानेवारी २०२२ मध्ये निवडणूक झाली होती. त्यावेळी भाजपने (BJP) नऊ जागा जिंकत सत्ता राखली होती. तर शिवसेनेला पाच तर अपक्ष तीन जागा मिळाल्या होत्या. अपक्षातील एक नगरसेवक भाजप पुरस्कृत आहेत. आता ठाकरे गटातील पाचपैकी तीन नगरसेवाकांनी सोमवारी (ता. २४) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यात सुभापष रावराणे, श्रद्धा रावराणे आणि प्रदीप रावराणे यांचा समावेश आहे. त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थित प्रवेश केला आहे.

दरम्यान, भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. राणे पितापुत्र ठाकरे यांच्यावर तर ठाकरे गटातील नेत्यांसह उद्धव ठाकरे हे राणे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in