बँकेवर झेंडा फडकावताच गायब नितेश राणे प्रकटले अन् म्हणाले, गाडलाच...

सिंदुधुर्ग जिल्हा बॅंक निवडणुकीत अनेकांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
बँकेवर झेंडा फडकावताच गायब नितेश राणे प्रकटले अन् म्हणाले, गाडलाच...

Satish Sawant, Nitesh Rane

sarkarnama

सिंधुदुर्ग : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँक (Sindhudurg District Bank Election) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने (BJP) बाजी मारली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. या निवडणूकीत अनेक दिग्गजांचे वर्चस्व पणाला लागले होते. मात्र, अनेकांना या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख सतिश सावंत (Satish Savant) हे चिठ्ठीवर पराभूत झाले आहेत. त्यावरुन भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

<div class="paragraphs"><p>Satish Sawant, Nitesh Rane</p></div>
राणेंचाच आव्वाज! जिल्हा बँकेत महाविकास आघाडीला दे धक्का

शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आरोप झाले. त्यानंतर नितेश राणे अज्ञातवासात आहेत. मात्र, त्यांच्या अधिकृत फेसबुक पेसवरुन निवडणूक निकालांसंदर्भातील एक पोस्ट व्हायरल होत आहे. फेसबुक पोस्टमध्ये नितेश राणे सतीश सावंत यांच्या मानेवर उभे राहिले आहेत. या पोस्टरवर 'गाडलाच' असे कॅप्शन लिहिले आहे. ही पोस्ट सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सावंत यांचा पराभव भाजप आणि राणेंसाठी महत्वाचा होता. सावंत यांचा पराभव करून विठ्ठल देसाई हे विजयी झाले. राणे आणि सावंत या दोघांनाही समान मते पडली. त्यामुळे चिठ्ठीवर देसाई हे विजयी झाले. दुसरीकडे भाजपचे वर्चस्व असले तरी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. या निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

<div class="paragraphs"><p>Satish Sawant, Nitesh Rane</p></div>
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्षांनाच पराभवाचा धक्का

भाजपच्या (BJP) सिद्धिविनायक पॅनेलचे आतापर्यंत १० उमेदवार निवडून आले आहेत. तर महाविकास आघाडीला ७ जागा मिळाल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांची प्रतिष्ठ पणाला लागली होती. नारायण राणे विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याच निवडणूक झाली. या निवडणुकीत दोन्ही पॅनलच्या दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. मात्र, आता चर्चा होत आहे ती नितेश राणे यांच्या पोस्टची.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in