नीतेश राणे अटक : फडणविसांच्या जनआशिर्वाद यात्रेचा पोलिसांनी जोडला संबंध

नीतेश (Nitesh Rane) हे तब्येत ठीक नसल्याने आज रुग्णालयात दाखल
Sachin Satpute-Nilesh Rane
Sachin Satpute-Nilesh Ranesarkarnama

कणकवली : शिवसेना कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) यांच्यावरील हल्लाप्रकरणी आरोप असलेले भाजपचे आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) आणि त्यांचे खासगी सचिव राकेश परब यांना आज येथील न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. जिल्हा आणि सत्र न्यायालयात दोन्ही संशयितांच्या जामिनासाठी अर्ज करण्यात आल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले. जामीन अर्जावर उद्या (ता. ५) सुनावणी आहे. दरम्यान, राणे यांची प्रकृती ठीक नसल्याचा मुद्दा मांडण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांची ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात आरोग्य तपासणी करण्यात आली.

Sachin Satpute-Nilesh Rane
विजय शिवतारेंचा राजकीय वारस ठरला; ममता लांडेंकडे शिवसेनेची मोठी जबाबदारी!

पोलिस कोठडीची मुदत संपल्याने राणे यांना दुपारी तीन वाजता येथील न्यायालयात हजर करण्यात आले. दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीस एस. ए. जमादार यांच्यासमोर दोन्ही बाजूच्या वकिलांनी बाजू मांडली. सरकारी वकिलांनी या घटनेचा अधिक तपास करण्यासाठी पुणे येथे संशयितांना घेऊन जाणे आवश्यक आहे. तेथील व्हॅनिटी व्हॅन जप्त करावयाची आहे. त्यासाठी कोठडीची मागणी केली. पुणे येथे गत जुलैमध्ये भाजपची जनआशीर्वाद यात्रा काढण्यात आली होती. यात्रेदरम्यानच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये नीतेश राणे आणि संशयित सचिन सातपुते यांचे एकत्रित छायाचित्र आढळले होते. त्यामुळे पुणे येथे चौकशी करावी लागेल, असे सरकारी पक्षाचे म्हणणे होते. राणे यांच्या वकिलांनी याला प्रतिवाद केला. सावंत हल्लाप्रकरणी सचिन सातपुते आणि इतर चारजणांना पोलिसांनी आधीच अटक केली आहे.

Sachin Satpute-Nilesh Rane
नितेश राणे तुरूंगात पुस्तक वाचण्यात दंग? फोटो व्हायरल

नीतेश राणे यांना तपासासाठी गोव्यात का नेले, हे पोलिसांनाच विचारा, असे राणे यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी माध्यमांना सांगितले. राज्य सरकारच्या भूमिकेवर नेहमी टीका करणारे केंद्रीयमंत्री नारायणे राणे यांनी आज मात्र प्रतिक्रिया देणे टाळले. ते आजच शहरात दाखल झाले. प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला; मात्र ते आपल्या खासगी कामात व्यग्र होते.

Sachin Satpute-Nilesh Rane
भाजपच्या बारा आमदारांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

दीपक केसरकर यांची टीका

नितेश राणे हे रुग्णालयात गेल्याच्या मुद्यावरून माजी गृहराज्यमंत्री आणि आमदार दीपक केसरकर यांनी टीका केली. तुरुंगात जाऊ नये म्हणून अनेक लोकांच्या तब्येती बिघडतात. आणि मग ते तुरुंगाऐवजी हॉस्पिटलमध्ये जातात. ज्यावेळेला मी या खात्याचा मंत्री होतो तेव्हा हे कधीही सहन केले नव्हते. मी ताबोडतोब युनिट पाठवून चेकिंग केलं. अनेकवेळा डॉक्टर, अधिकारी सगळे दबावाखाली येतात आणि नंतर मग असे प्रकार घडतात. मी गृहराज्यमंत्री असताना या खात्याचा अनुभव घेतला आहे. अनेक लोक हे आजाराचं निमित्त करतात आणि पोलीस कस्टडी किंवा जेलमध्ये जाण्यापासून दूर राहतात. त्यामुळे एक दिवस तरी जेलमध्ये जाणं काय असत हा अनुभव वेगळा असतो आणि त्यांनी तो घेतला असता तर पुऱ्या आयुष्यात वाईट कृत्य करण्याची त्यांची हिंमत झाली नसती, अशी जोरदार टीका केसरकर यांनी सावंतवाडीत घेतलेल्या पत्रकार परिषदेतून नितेश राणेंवर केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in