'गाठ माझ्याशी आहे...'; निलेश राणेंनी थेट अधिकाऱ्यांनाच धारेवर धरलं

Nilesh Rane|Malvan| पावसामुळे मालवण बाजारपेठांसहित अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने निलेश राणे यांनी आज मालवण नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढला
Nilesh Rane news
Nilesh Rane news

मालवण : 'आत्ता सत्ता बदलली आहे, गाठ माझ्याशी आहे, आज आमचीच सत्ता आहे,' असा दम देत भाजप नेते निलेश राणे यांनी मालवण नगर परिषदेच्या अधिकाऱ्याला धारेवर धरलं. इतकचं नव्हे तर सत्ताधाऱ्यांसोबत मिळून मालवण शहराची वाट लावली, असा आरोपही त्यांनी केला. निलेश राणे यांनी आज मालवण नगरपरिषदेवर धडक मोर्चा काढला यावेळी त्यांनी नगर परिषदेच्या अधिकाऱ्याला खडे बोल सुनावले. (Nilesh Rane latest news)

मुसळधार पावसामुळे मालवण नगरपरिषद कार्यक्षेत्रात बाजारपेठांसहित अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांनी नगरपरिषदेच्या कामांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर निलेश राणे मालवण नगरपरिषदेत पोहोचले आणि र्वांसमोर मुख्य कार्यकारी अधिकारी जिर्गे यांना खडे बोल सुनावले. आपण शिवसेनेचे पदाधिकारी आहात का? असा सवाल करत निलेश राणेंनी अधिकारी जिर्गे यांच्यावर आगपाखड केली.

Nilesh Rane news
ठरलं तर! शिवसेना एनडीएच्या उमेदवारालाच मतदान करणार ! राऊतांनी दिले संकेत

तुम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहात का? अशी विचारणाही निलेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्याला केली. यापूर्वीही मी तुम्हाला एका वाईन शॉपची तक्रार दिली होती, पण तुम्ही काहीच कारवाई केली नाही, अशी आठवण त्यांनी करुन दिली. ’आम्ही सत्तेत नसताना गप्प बसलो नाही. आज आमचीच सत्ता आहे. आता टेबल फिरलं आहे. आता तुम्ही काय करणार, तुम्ही शहराचं वाटोळ केलं, आता फायर ब्रिगेडची गाडी गल्लीत जाणार का??,” असे अनेक सवाल निलेश राणेंनी केले.

आमच्या वाकड्यात जाऊ नका, असं मी गेल्यावेळीच सांगितलं होतं. आज ते आमदार येतील का तुम्हाला वाचवायला, काही ठराविक नगरसेवकांच्या मतदारसंघात तुम्ही नालेसफाई करुन घेतली. ठरवलं आहे का? असंही त्यांनी विचारलं. “मी तुमच्या हातात निवेदन देणार नाही, आपले हात पवित्र नाहीत. त्यामुळे टेबलावरचे निवेदन उचलून दिलेली कामे तातडीने मार्गी लावा,” असं निलेश राणेंनी यावेळी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in