Maharashtra Politics : राष्ट्रवादीला मोठा धक्का! कोकणातील 'हा' नेता करणार ठाकरे गटात प्रवेश?

konkan News : रामदास कदमांना मोठं आव्हान देण्यासाठी ठाकरेंची नवी खेळी
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama

konkan Politics : दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय कदम उद्या मातोश्रीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राष्ट्रवादी नेते संजय कदम हे दापोली मंडणगड मतदारसंघातील शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि योगेश कदम यांचे राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे कदम पिता-पुत्रांना शह देण्यासाठी ठाकरे गटाकडून कदमांना बळ दिलं जाण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray
Shivsena : मोठी बातमी! शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड

दापोली मंडणगडचे माजी आमदार संजय कदम हे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जर असं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. संजय कदम हे सध्या राष्ट्रवादीत असून ते लकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Uddhav Thackeray
Shivsena : शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेची त्रिसदस्यीय शिस्तभंग समिती

या पार्श्वभूमीवरच संजय कदम हे उद्या (दि.22 फेब्रुवारी) शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर संजय कदम यांचा ठाकरे गटात पक्ष प्रवेश 5 मार्चला खेड येथील सभेत होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे कोकणात ठाकरेंचे बळ वाढणार असून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुन्हा एकदा दापोली मडंणगड मतदारसंघात चुरस निर्माण होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com