सन्मान मिळाला तरच शिवसेनेसोबत आघाडी : राष्ट्रवादीचा इशारा

वैभववाडी नगरपंचायत निवडणूक स्वबळावर लढवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी
Shivsena-NCP
Shivsena-NCPSarkarnama

वैभववाडी (जि. सिंधुदुर्ग) : भारतीय जनता पक्षाला (BJP) सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढविल्या जाव्यात, असा आमचा आग्रह आहे. संख्यात्मक नव्हे; तर गुणात्मक फॉर्म्युल्यानुसार जागावाटप व्हावे, अशी आमची भूमिका आहे. शिवसेनेकडून (shivsena) सन्मानजनक प्रस्ताव आला नाही तर मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) निवडणूक स्वबळावर लढवेल, असे राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक काका कुडाळकर यांनी येथे सांगितले. (NCP is preparing to contest Vaibhavwadi Nagar Panchayat elections on its own)

वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याशी बैठक झाली. या बैठकीनंतर कुडाळकर यांनी पत्रकाराशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर, रूपेश जाधव, अभिनंदन मांलडकर, समीर आचरेकर, देवेंद्र पिळणकर, सर्वेश पावसकर आदी उपस्थित होते.

Shivsena-NCP
संजय काळेंच्या बिनविरोधसाठी आमदार बेनके लागले कामाला; आशा बुचकेंच्या भूमिकेकडे लक्ष

काका कुडाळकर म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवणे, हाच आमचा मुख्य अजेंडा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी होण्यासाठी आम्ही आग्रही आहोत. काँग्रेसकडून जरा स्वबळाची नारा देण्यात आला असला तरी जिल्ह्याची स्थिती वेगळी आहे. त्यानुसार काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनी निर्णय घ्यावा. आम्ही जरी महाविकास आघाडीकरीता आग्रही असलो तरी शिवसेनेकडून सन्मानजनक प्रस्ताव आमच्याकडे यायला पाहिजे. तसा प्रस्ताव आला नाही, तर आम्हीदेखील स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. ठराविक जागाच आम्हाला मिळाल्या पाहिजेत, असा आमचा आग्रह असणार नाही. मात्र, ज्या पक्षाकडे निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेला उमेदवार असेल त्यालाच उमेदवारी देण्यात यावी.

Shivsena-NCP
दोन मंत्री, तीन आमदार जिल्हा सहकारी बॅंक निवडणुकीच्या रिंगणात!

संख्यात्मक नव्हे; तर गुणात्मक निकषांवर आघाडी व्हायला हवी. आम्ही अवाजवी मागणी करणार नाही. पाच वर्षांत सत्ताधारी पक्षाने कोणतीही विकासकामे केलेली नाहीत. त्यामुळे नागरिकांना विकास हवा आहे. वैभववाडी शहरात नागरी सुविधा, घनकचरा व्यवस्थापन यांसह विविध विकासकामे होणे अपेक्षित होते; परंतु ती झालेली नाहीत. स्थानिक आमदार विकास करू शकलेले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे, असे कुडाळकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in