दुरावा वाढत चालेल्या जयंत पाटलांबाबत सुनील तटकरे म्हणाले...

आपल्या वक्तव्याने कोणीही दुखवणार नाही, याची काळजी सुनील तटकरे यांनी घेतली आहे.
Jayant Patil_Sunil Tatkare
Jayant Patil_Sunil TatkareSarkarnama

अलिबाग : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून शेतकरी कामगार पक्षाला एकाकी पाडण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत आहे. तसेच, रायगडमध्ये अजूनही मित्र असलेले शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येची शाब्दीक बाचाबाची होत आहे. त्याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी भाष्य केले आहे. शेकापचे नेते, आमदार जयंत पाटील आपल्यापासून दूर गेले आहेत, त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न होईल का, यावर प्रश्‍नावर तटकरे यांनी स्पष्टपणे उत्तर न देता कोणी जवळ किंवा दूर गेलेले नाही, असे सांगून आपल्या वक्तव्याने कोणीही दुखवणार नाही, याची काळजी घेतली आहे. (The Nationalist Congress Party's cautious stance on PWP)

रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष राजकीय गणिते जुळविण्याचे प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि शेकाप या दोन जुन्या मित्रपक्षांमध्ये सध्या वारंवार शाब्दीक चकमकी होत आहेत. त्यानंतरही राष्ट्रवादी कॉंग्रेस हा शेकापची साथ सोडण्यास तयार नसल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते, खासदार सुनील तटकरे यांनी तर शेकापच्या नेत्यांकडून होत असलेली टीका ही एखाद्या निवडणुकीची बाब असून शेकापचे नेते आपल्यापासून दूर गेले नाहीत, असे स्पष्ट करत शेकापला गोंजारण्याचा प्रयत्न केल्याने रायगडचे राजकारण कोणत्या दिशेला जाणार, याबाबत चर्चा सुरू आहे.

Jayant Patil_Sunil Tatkare
कृषी विषय राज्याचा की केंद्राचा ; प्रकाश आंबेडकरांचा प्रश्न

शेकापला एकाकी पाडण्यासाठी शिवसेनेने अनेक प्रयत्न केले आहेत. यासाठी राष्ट्रवादीशी सलगी करून राष्ट्रवादी-कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र निवडणुका लढविणार असल्याचेही चित्र निर्माण करण्यात आले होते. कुसुंबळे येथे यासाठी एका कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते; मात्र त्यावेळीही सुनील तटकरे यांनी शेकापबरोबर सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वरिष्ठांच्या आदेशानुसार आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेऊन लढवल्या जातील, असे तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी अलिबाग येथे झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना यांचे महाविकास आघाडीचे सरकार आहे, तर रायगड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप अशी आघाडी आहे. शिवसेना विरोधी बाकावर आहे. अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये मित्रपक्ष शेकापला बरोबर घेऊन लढणार का, या प्रश्‍नावर तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले, तेव्हा या जिल्ह्यामध्ये २०१७ मध्ये निवडणूकपूर्व राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापची आघाडी झाली होती. २०१९ च्या नंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले, त्यावेळी शिवसेना नेत्यांचा आग्रह होता की नवीन राजकीय समीकरणाप्रमाणे जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन व्हावी. पण आपण स्पष्ट भूमिका घेतली की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप आघाडी ही पाच वर्षांसाठी झाली आहे. ती पाच वर्षे कायम रहाणार आहे. राज्यातील सत्तेची समीकरणे जरी बदलली तरी ही आघाडी कायम राहील.

Jayant Patil_Sunil Tatkare
मोदी सरकारची कोंडी; केंद्रीय मंत्र्यांवर कारवाईची भाजप खासदारांचीच मागणी

दरम्यान, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील आपल्यापासून दूर गेले. त्यांना जवळ करण्याचा प्रयत्न होईल का, यावर प्रश्‍नावर खासदार तटकरे यांनी सांगितले होते की, कोणी जवळ किंवा दूर गेलेले नाही. आगामी काळात जिल्ह्यातील नगरपंचायती, पालिका, जिल्हा परिषद निवडणुका आहेत. आघाडी सरकारने वटहुकूम काढून ओबीसी आरक्षण दिले आहे. तसेच, राज्य सरकारने निर्णय घेऊन नगरपालिकांमध्ये नगरसेवकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. नगरविकास खात्याप्रमाणे ग्रामविकास खाते जिल्हा परिषद संख्या वाढते का हेही पाहावे लागणार आहे, असे तटकरे म्हणाले.

स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच आघाडीचा निर्णय

राज्यात जे तीन प्रमुख पक्ष सत्तेत आहेत, त्यातील राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शिवसेना आणि काही मित्र पक्ष यांचा सरकारला पाठिंबा आहे. या पक्षांनी एकत्रितपणे रायगड जिल्ह्यात निवडणुका लढवाव्यात, अशी चर्चा वरिष्ठ पातळीवर चालू आहे. पण, त्याला अद्याप कोणतेही अंतिम स्वरूप आलेले नाही. वेगवेगळ्या जिल्ह्यांत वेगवेगळी राजकीय परिस्थिती आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पुरता चर्चा झाली की संबंधित जिल्ह्यातील राजकीय समीकरणे लक्षात ठेवून जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मते अजमावून राज्याच्या नेत्यांशी चर्चा होईल. त्यानंतर जिल्ह्यात निवडणुका लढवण्याचा योग्य तो निर्णय होईल. भविष्यात आज जशी राज्यात राजकीय परिस्थिती आहे, त्याप्रमाणेसुद्धा निवडणुका लढवल्या जाऊ शकतात. त्या दृष्टीने निवडणुका जेव्हा घोषित होतील तेव्हा वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल. तसेच जिल्हा पातळीवर पुन्हा चर्चा होऊ शकते, असे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com