राणे पालकमंत्री असतानाच सिंधुदुर्गमधील ७० टक्के उद्योग बंद पडले

बंद पडलेल्या उद्योगांना ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी नारायण राणे यांनी कोणतेच प्रयत्न केले नाहीत.
Deepak kesarkar-narayan rane
Deepak kesarkar-narayan raneSarkarnama

कुडाळ : नारायण राणे (Narayan Rane) पालकमंत्री असताना एमआयडीसीतील ७० टक्के उद्योग बंद होते. त्यांना ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी राणे यांनी कोणतेच प्रयत्न केले नाहीत. फक्त घोषणा करण्यापलीकडे त्यांनी काहीच केले नाही. ते पालकमंत्री असताना गार्डनसाठी नगरपंचायतला पाच लाख देत होते. मी ५ कोटी दिले. हा विकासाचा आमच्यात व त्यांच्यात फरक आहे, असे माजी पालकमंत्री, आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आज येथे सांगितले. (Narayan Rane was Guardian Minister, 70% of industries in Sindhudurg were shut down: Kesarkar)

कुडाळ उद्योगनगरी वैभवशाली करण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व १७ उमेदवार विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. काँग्रेसने आघाडीत सहभाग घ्यावा याबाबत चर्चा सुरू असल्याचेही ते म्हणाले. कुडाळ नगरपंचायतची २१ ला निवडणूक होत आहे. आज सायंकाळी आमदार केसरकर यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.

Deepak kesarkar-narayan rane
संतापजनक : गृहमंत्र्यांनीच पोलिसांची तुलना केली कुत्र्यांशी!

यावेळी केसरकर म्हणाले, ‘‘नारायण राणे यांनी अनेक मंत्रिपदे भूषविली; पण ते कुडाळच नव्हे, तर जिल्ह्याचासुद्धा विकास करू शकले नाहीत. आजारी असणाऱ्या एमआयडीसीला ऊर्जितावस्थेत आणण्याचे काम आम्ही केले आहे. त्यांच्याकडून कुडाळच्या विकासात अजिबात योगदान नाही. विद्यमान नगरपंचायतमध्ये विकासात्मक निधी आणण्यासाठी आमदार नाईक सक्षम होते; पण हा निधी वापरू नये, यासाठी या नगरपंचायतने सातत्याने आडमुठे धोरण घेतले. मी या ठिकाणी गार्डनसाठी ५ कोटींचा निधी मंजूर केला होता. शिवसेना महाविकास आघाडीच्या माध्यमातून या उद्योगनगरीचा विकास झाला आहे, हे येथील नागरिकांना माहिती आहे. म्हणूनच योग्य असे १७ उमेदवार आम्ही दिले आहेत. ते १७ ही उमेदवार विजयी होतील.’’

Deepak kesarkar-narayan rane
तुमच्या लोकप्रियतेवर नव्हे; तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमुळे तुम्ही खासदार : मोहितेंनी कोल्हेंना सुनावले

ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडी व्हावी, त्यादृष्टीने प्रयत्न होते. आम्ही काँग्रेसबरोबर युती करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले; परंतु त्यांच्या राजकीय धोरणामुळे ते शक्य झाले नाही. आघाडीबाबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना येथील परिस्थितीबाबत माहिती दिली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी शिवसेना ही काँग्रेसला ॲडजेस्ट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करेल. यासाठी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार नाईक प्रयत्न करत आहेत. पाच वर्षांपूर्वी कुडाळ हे विरोधी सत्तेकडे होते आणि आता या महागाईच्या विरोधात भाजपकडे जर गेले तर परत कुडाळचा विकास थांबणार आहे. कुडाळच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात द्या.’’

Deepak kesarkar-narayan rane
रस्त्याच्या श्रेयवादातून आमदार बेनके-आशा बुचके आले आमनेसामने

यावेळी आमदार वैभव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अमित सामंत, संदेश पारकर, काका कुडाळकर, संजय पडते, सुनील भोगटे, अतुल बंगे, अमरसेन सावंत, सुशांत नाईक, विकास कुडाळकर, संजय भोगटे, संतोष शिरसाट, रुपेश पावसकर, जयराम डिगसकर, बबन बोभाटे आदी उपस्थित होते.

तर काँग्रेसला आमच्यातील जागा देऊ

कुडाळ नगरपंचायतीच्या १४ जागांवर शिवसेना व ४ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवतील. काँग्रेसशी बोलणे सुरू असून यदाकदाचित त्यांचा निर्णय बदलल्यास शिवसेनेच्या १४ जागांपैकी काही जागा त्यांना दिल्या जातील, असे आमदार केसरकर, आमदार नाईक यांनी स्पष्ट केले. उमेदवार यादी उद्या टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com