इथून परत जाणं एवढं सोपं नाही! राणेंचा जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोर इशारा

या ठिकाणी कोणतेही राजकारण करुन नये, असे मला वाटत होते.
Narayan Rane
Narayan Ranesarkarnama

मुंबई : सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाचे उद्घाटन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या उपस्थितीत झाले. विमानतळाच्या उद्घाटनासाठी सगळे मंत्री आले मला आनंद आहे. सगळ्यांनी यावे, चांगल्या मनाने यावे. वाईट मनाने आणि वाईट बुद्धीने येणाऱ्यांना सिंधुदुर्गातून परत झाणे येवढे सोपे नाही, असे यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले.

Narayan Rane
मेडिकल कॉलेजच्या जागेसाठी लोकांवर अन्याय; आमदार महेश शिंदे याचिका दाखल करणार

राणे म्हणाले, या ठिकाणी कोणतेही राजकारण करुन नये, असे मला वाटत होते. आपण जावे शुभेच्छा द्या आनंद आहे. चिपी विमानतळावरुन विमान उडणार आहे. मुख्यमंत्री साहेबही भेटले माझ्या काणाजवळ काहीतरी म्हणाले. या जिल्ह्यात आर्थिक भरभराठी व्हावी. १९९० मध्ये मला बाळासाहेब ठाकरे यांनी पाठवले. मी निवडूण आलो. त्यानंतर मी जिल्ह्यातील अडचणी समजून घेतल्या. पाऊस पडतो पण फेब्रुवारी महिन्यात पाणी प्यायला मिळत नव्हते. रस्ते नव्हते, वीज नव्हती. शैक्षणिक अवस्था वाईट होती.

मुंबईवर हा जिल्हा अवलंबून होता. मी १९९० मध्ये आलो त्यावेळी मी विकास केला. हे मी सांगत आहे. पण सगळे लोकांना माहीत आहे. अडीअडचणीत कोण उपयोगी पडतो हे लोकांना माहिती आहे. उद्धवजी हे सगळे साहेबांकडून आत्मसात केले, त्यात माझा स्वार्थ नव्हता. साहेबांच्या आशीर्वादाने मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो. गोपीनाथ मुंडेंनी मोठा निधी दिला. जिल्ह्याचा विकास माझ्यामुळे झाला, दुसऱ्याचे नाव जवळपास सुद्धा येवून शकत नाही, त्यावेळी मी शिवसेनेत होतो.

Narayan Rane
राणे, ठाकरे शेजारी बसले पण एकमेकांकडे बघितलं नाही अन् बोललेही नाहीत!

उद्धवजी एक विनंती आहे. माझ्याकडे फोटो आहोत. आम्ही २०२९ मध्ये या जागेचे भूमिपूजन करण्यासाठी आलो होतो. त्यावेळी समोर आंदोलन करण्यात येत होते. मी नाव घेतले तर राजकारण होईल. आम्हाला विमानतळ नको, म्हणून आंदोलन करणारे आज स्टेजवर आहेत. मला काही म्हणायचे नाही. तुम्ही आलात मला आनंद आहे. आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री आहेत. त्यांनी जिल्ह्याचा अभ्यास करावा. हा कार्यक्रम कोणाचा आहे तेच कळत नाही. काय प्रोटोकॅाल नाही. तुमचे लोकप्रतिनिधी काय करत आहेत, त्यांची माहिती घ्या. त्यांची माहिती घेण्यासाठी कोणाला तरी नियुक्त करा. आदित्य आमच्या जिल्ह्यात आले, त्यांचे स्वागत आहे. त्यांनी चांगले काम करावे, मला आनंद होईल. त्यांच्यासाठी माझ्या शुभेच्छा.

मी केंद्रीय मंत्री आहे. देशातील ८० टक्के उद्योग माझ्या मंत्रालयाकडे आहेत. महाराष्ट्रात जास्तीत जास्त उद्योग आण्यासाठी मी प्रयत्न करणार. विनायक राऊत विमानात माझ्याकडे पेढा घेऊन आले. मी थोडासा घेतला त्यांना सांगितले की पेड्याचा गुणधर्म गोड आहे. त्याचा गुणधर्म थोडासा घ्या, असा टोला राणे यांनी राऊतांना लगावला. मी देवाकडे पार्थना करीन की सगळ्या मंत्र्यांना चांगले आयुष्य लाभू दे. त्यांच्या काही मनोकामना असतील तर त्या पुर्ण होउ दे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com