'शिवसेना आता कधीही...'; राणेंनी ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळलं

Narayan Rane| Uddhav Thackeray| महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे मी अनेकदा सांगितले होते
Narayan Rane news
Narayan Rane news

सावंतवाडी : ''शिवसेना संपवायला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, संजय राऊत हेच जबाबदार आहेत. मुख्यमंत्री असूनही त्यांना सरकार वाचवता आले नाही. यासारखे दुर्देव नाही, उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्तवात शिवसेना आता पुन्हा कधीही उभी राहणार नाही, अशा शब्दांत टीका करत राणेंनी ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळले. राज्यातील सत्तानाट्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी भाष्य करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले आहे.

गोव्यावरून कणकवली कडे जात असताना सावंतवाडीत थांबले असता राणेंनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ''मुख्यमंत्री असूनही आपल्याच पक्षातील आमदार खासदारांना न भेटणे, मंत्र्यांना तासनतास ताटकळत बंगल्याबाहेब उभे करून ठेवणे, यामुळेच नेत्यांचा ठाकरेंवरील रोष वाढत गेला आणि शिवसेनेतील इतके आमदार फुटले. ते आमदार वाचवू शकले नाहीत तर मतदार कसे वाचवणार, ही क्षमता उद्धव ठाकरेंमध्ये नाही, त्यामुळे आता त्यांनी गप्प बसुन घरातच आराम करावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

Narayan Rane news
Satara : 'ईडी'ची भीती दाखवून राज्यात सत्ता मिळवली... पृथ्वीराज चव्हाण

संजय राऊतांनी शिवसेनेला मागे ओढण्याचे काम केले. पंचवीस वर्षे आमची सत्ता राहिल असं संजय राऊत म्हणाले होते, पण काय झालं, या दोघांची मानसिक स्थिती बरोबर नाही, शंभरच्या वर ताप गेल्यावर माणसं कशी बडबडतात, तसं ते काहीही बरळत आहेत, आता त्यांचा ताप एकशे एकवर गेला आहे, अशी टीकाही नारायण राणेंनी केली. पण आता महाराष्ट्राची वाटचाल विकासाच्या दिशेने होणार आहे, राज्यात नवनवीन प्रकल्प येतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हेच चांगले काम करतील, असा विश्वास नारायण राणेंनी व्यक्त केला.

" महाविकास आघाडी सरकार कोसळणार हे मी अनेकदा सांगितले होते. कारण याची कल्पना मला आधीच होती. आता शिवसेनेच्या चिन्हाबाबात असलेला प्रश्न हा कायद्याच्या बाबीवर अवलंबून आहे. येत्या 11 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या निर्णयानंतर पक्ष पुढचा निर्णय घेईल. पण राज्यातील शिंदे-फडणवीसांचे हे सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्याबरोबरच हे राज्य लोक कल्याणकारी राज्य बनावे यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचं नारायण राणेंनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in