Nilesh Rane News : साहेब, तुमची सगळी स्वप्ने पूर्ण झाली, आता मुलाकडे बघा; निलेश राणेंची वडीलांकडे प्रेमळ तक्रार..

Nilesh Rane On Narayan Rane : माझी गाडी कुठे अडली?
Nilesh Rane News :
Nilesh Rane News :Sarkarnama

Nilesh Rane On Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र व माजी खासदार निलेश राणे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची थांबलेल्या गाडीबद्दल मंचावरून जाहीरपणे प्रश्न विचारला आहे. २०२४ मध्ये तरी आपल्याला संधी मिळावी, असे निलेश राणे यांनी त्यांचे वडील नारायण राणेंना म्हणाले आहेत. एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी असा लडीवाळ जाब आपल्या वडीलांनी विचारत, तक्रार केली आहे.

Nilesh Rane News :
Konkan politics :कोकणात पुन्हा संघर्ष; ठाकरे- शिंदे गटात बाचा-बाची; संजय कदमांचा अधिकाऱ्यांवर संताप

एका कार्यक्रमात बोलताना निलेश राणे म्हणाले, "मी राणेंसाहेबांना अनेक भूमिकेमधून बघितलं. नेता म्हणून तर बघितलं, वडील म्हणूनही बघितलं. त्यांना अनेक भूमिकेतून बघत बघत मी इथे आलो. सांगण्यासारख्या आठवणी भरपूर आहेत. मात्र या कार्यक्रमात माझा माईक जर आयोजकपरचुरे यांच्या हाती नसता, माझ्या हाती असता तर मी त्यांना एकच प्रश्न विचारला असता. मी मागच्या एका भाषणात म्हणालो होतो, साहेब आपली सगळी स्वप्ने पूर्ण झाली, आता मला बघा. ते बघितलंत का? हे विचारलं असता," असे राणे म्हणाले.

"आपली गाडी कुठपर्यंत आली? आता २०२४ आहे. आता दाढी किती पिकायची राहिली माहित नाही. मी आज पुन्हा विचारतो. एक वर्ष मी थांबलो. साहेबांकडून काही उत्तर नाही आलं. साहेब दौऱ्यावर कुठेतरी गावामध्ये. अशी ही आमची परिस्थिती," असे ही राणे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला.

Nilesh Rane News :
Vinayak Raut News : भाजप नेत्यांसारखे बकवास करणारे आमच्याकडे नाहीत, नागपुरात दुप्पट लोक असतील !

ठकधी कधी राणे साहेबांनादुखवून किंवा ऐकवून असं वाटतं, साहेबांना माहिती आहे ना आपण आता भाजपमध्ये आलो आहोत. नितेश तिथे खूप रूळला, असं वाटतं तो खूप वर्षे भाजपमध्ये आहे. मी म्हणतो माझाच घोडा कुठे अडला? माझी गाडी पुढे जात नाही. आपण शिवसेनेत मग स्वाभिमानमध्ये मगमाझी गाडी कुठे? असो साहेबांकडे बघूनच खूप काही शिकलो. म्हणून आपली गाडीसाठी २०२४ आहे आता, असेच हसत राहा," असे राणे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com