पटोले आले अन् आघाडीत मिठाचा खडा टाकून गेले!

नगरपालिकेत आघाडी संदर्भात राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने नाना पटोले यांची भेट घेतली होती
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

Nana Patole : चिपळूण : चिपळूण पालिका निवडणुकीसाठी आघाडीचा प्रस्ताव घेवून राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची भेट घेतली. तेव्हा 'काँग्रेसचा (Congress) नगराध्यक्ष असेल तर बोला' असे पटोले यांनी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाला सांगितले. त्यामुळे पटोले आले आणि आघाडीत मिटाचा खडा टाकून गेल्याची चर्चा सुरू झाली आहे.

चिपळूण पालिकेची मागील निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) स्वतंत्रपणे लढवली होती. यामध्ये काँग्रेसने पाच जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागांवर यश मिळवले होते. मात्र, दोन्ही कॉंग्रेसने पालिकेवर सत्ता मिळवण्यात अपयश आले. शिवसेनेचे सर्वाधिक 11 नगरसेवक निवडून आले होते. भाजपचे तीन नगरसेवक निवडून आले होते. मात्र, नगराध्यक्ष भाजपचा निवडून आला होता. दोन्ही काँग्रेस स्वतंत्र लढल्याचा फटका बसला होता.

Nana Patole
Shinde : दोन मुख्यमंत्र्यांची सवय तुम्हाला होती, आम्ही तुमचा रिमोट काढून घेतला..

यामुळे या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व्हावी, असा मतप्रवाह सुरू झाला आहे. या दृष्टीने काही दिवसांपूर्वी दोन्हीकडून सकारात्मक चर्चा देखील झाल्या होत्या. दरम्यान, नाना पटोले रविवारी रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी चिपळूणात जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

Nana Patole
कसं काय पाटील बंर हाय का, दिल्लीत घडलं ते खरं हाय का : मुख्यमंत्र्यांचा जयंतरावांना चिमटा

हा मेळावा संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष जयद्रथ खताते, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, चिपळूण अर्बन बँकेचे संचालक सतीश खेडेकर, अविनाश हरदारे आदींनी पटोले यांची भेट घेऊन चिपळूण पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी व्हावी असा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, काँग्रेसचा नगराध्यक्ष असेल तर बोला असे पटोले यांनी सांगितले. यामुळे चिपळूण पालिका निवडणुकीसाठी काँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी होणार की नाही? आता या मुद्द्यावरूनच आघाडीचे भवितव्य असणार आहे, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com