`शिवसेनेतील हप्तेखोर नेते कोण, हे नारायण राणे यांनी जाहीर करावेच!`

चिपी विमानतळाच्या (Chipi) श्रेयावरून सुरू झालाय वाद
`शिवसेनेतील हप्तेखोर नेते कोण, हे नारायण राणे यांनी जाहीर करावेच!`
Narayan Rane-Vaibhav Naiksarkarnama

सिंधुदुर्ग : शिवसेनेच्या हप्तेखोरांची नावे नारायण राणे (Narayan Rane) यांनी जाहीर करावीच, असे आव्हान शिवसेनेचे आमदार वैभव नाईक (MLA Vaibhav Naik) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दिले आहे.

येथील चिपी विमानतळाचे उदघाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय हवाई मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि नारायण राणे यांच्या उपस्थितीत होत आहे. या विमानतळाच्या श्रेयावरून राजकीय शिमगा पेटला आहे.

Narayan Rane-Vaibhav Naik
`माझे नाव किती छोट्या अक्षरात छापले आहे, किती हा क्षूद्रपणा!`

या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर छोट्या आकारात नाव टाकल्याचा आरोप करत यात राजशिष्टाचार पाळला गेला नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. हे कमी आकारात नाव छापणे म्हणजे क्षूद्रपणा असल्याचा टोला शिवसेनेला लगावला होता. राणे एवढ्यावरच न थांबता शिवसेनेने येथील विकासकामांना कसा विरोध केला आणि येथील शिवसेनेचे नेते हफ्तेखोर असल्याने त्यांची नावे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जाहीर करणार असल्याचा इशारा दिला होता.

राणे यांच्या वक्तव्यावर टीका करताना वैभन नाईक म्हणाले की नारायण राणे यांनी अशा हफ्तेखोर नेत्यांची नावे हिम्मत असेल उघड करावी. मुंबई- गोवा महामार्गाच्या कामाला का सुरुवात का झाली नाही आणि सुरुवात झाल्यानंतर चिखलफेक करून कोणी काम थांबवले होते आणि कुठल्या वाटाघाटीमध्ये काम सुरू झाले, हे सुद्धा आम्ही उघड करू. रेडी पोर्ट कोणाच्या फायद्यासाठी आहे आणि कोणाची त्यात भागिदारी आहे, हे सुद्धा आम्ही जाहीर करू.

आमदार वैभव नाईक यांचा राणेंवर प्रतिहल्ला

राणेंनी शिवसेनेवर आरोप करण्यापेक्षा जिल्ह्याच्या विकासकामांमध्ये किती हातभार लावला आहे, हे पाहावे. जिल्ह्यात होत असलेल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुद्धा विरोध कोणाचा आहे, हे आम्ही जाहीर करू. येथील साखर कारखाना कोणी रद्द केला? राणे हे ज्यावेळी उद्योगमंत्री होते तेव्हा त्यावेळी कोणता उद्योग आणला, याचेही उत्तर त्यांनी द्यावे. शिवसेनेचा एकही कार्यकर्ता हप्ता घेत असेल तर तसेही जाहीर करावे, अशा शब्दांत वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिले.

Related Stories

No stories found.