Shekhar Nikam: कोणत्याही विकासकामांचे श्रेय नको, पण...; आमदार शेखर निकमांनी मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी

Chiplun Politics: "राज्यात आज महाविकास आघाडीचं सरकार असतं तर चिपळूणचा कायापालट केला असता..."
Shekhar Nikam
Shekhar NikamSarkarnama

Chiplun News: "कोणत्याही विकासकामांचे श्रेय नको. ज्याला श्रेय हवे त्यांनी ते घ्या, मात्र, कोकणातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी पाझर तलाव मंजूर करा", अशी मागणी चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. आमदार शेखर निकम यांनी कोकणातील विविध प्रश्नासंदर्भात भाष्य करत जनतेचे प्रश्न सुटावे, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

आमदार निकम म्हणाले, "मी विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळे कोकणातील जर पाझर तलावांचे प्रस्ताव मंजूर झाले तर त्याचं श्रेय मला मिळेल, त्यामुळे पाझर तलावांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जात नाही. पण विकासकामांचे श्रेय घेणे ही माझी सवय नाही.

काम करत राहणारा मी कार्यकर्ता आहे. राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर माझ्या मतदारसंघात फोडाफोडीचं राजकारण झालं. याबरोबरच मंजूर झालेली कामंही रद्द झाली. कार्यकर्त्यांनाही आमिष दाखवण्यात आलं, पण माझा एक कार्यकर्ता जागेवरून आलेला नाही", असं ते म्हणाले.

Shekhar Nikam
Chandrakant Khaire On Rane : राणेंची पोरं रिकामटेकडी, त्यांना अक्कल आहे का?

"सरकार हे येत असतात जात असतात. पण काम करत राहणं गरजेचं आहे. मी आमदार निधी खर्च केला तर त्याचं श्रेय मला मिळाल पाहिजे, असं काही नाही. कारण मी लोकसेवक आहे, लोकांनी मला त्यासाठीच निवडून दिलं आहे. पालकमंत्री रत्नागिरीचे आहेत.

ते आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करतील. चिपळूणमध्ये माझ्या पराभवासाठी ते प्रयत्न करतील. पण यातून आमचे मैत्रीचे संबंध तुटणार नाहीत. कारण राजकारणासाठी हे सर्व करावे लागते. पालकमंत्र्यांनी रमेश कदम यांची भेट घेतली. मात्र, यामध्ये नवीन काही नाही. कारण, त्यांचे आणि आमच्या सर्वांचे संबंध मैत्रीचे आहेत. ते माझ्याकडेही येतात. रमेश कदम राष्ट्रवादी सोडणार नाहीत, याचा मला विश्वास आहे", असंही त्यांनी सांगितलं.

Shekhar Nikam
Rohit Pawar meets Jay Shah: रोहित पवारांनी घेतली जय शाहांची भेट; कारण काय?

दरम्यान, "राज्यात आज महाविकास आघाडीचं सरकार असतं तर चिपळूणचा कायापालट केला असता. विविध विकास कामे मार्गी लावले असते. काँग्रेसच्या काळात अनेक शासकीय योजना राबवण्यात आल्या. मात्र, काँग्रेसने कधी गाजावाजा केला नाही. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडूनही काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत", असं यावेळी ते म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com