आम्ही केवळ बदाम खायला जायचे का?

नितेश राणे (Nitesh Rane) यांची उदय सामंत (Uday Samant) यांच्यावर टीका
Nitesh Rane
Nitesh RaneSarkarnama

ओरोस : राज्यात ठाकरे सरकार (Thackeray Govt) आल्यापासून सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यावर अन्याय होत आहे. निधी नसल्याने रस्त्याची कामे ठप्प झाली आहेत. सदस्यांना विश्वासात न घेता जिल्हा नियोजनची कामे मंजूर केली जात आहेत. त्यामुळे जिल्हा नियोजन सभेत आम्ही केवळ बदाम खायला जायचे का ? पालकमंत्र्यांची खोटी आश्वासने एकायला जायचे का ? असे प्रश्न करीत या सभेवर भाजप बहिष्कार घालत असल्याचे भाजप आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Nitesh Rane
रत्नागिरी SP आता राणेंच्या रडारवर : दापोली पोलिस ठाण्यात ते अर्ध्या तासात कसे पोहोचले?

जिल्हा नियोजन सभा 11 वाजता सुरू होणार असताना आमदार राणे यांनी नियोजन सभागृहाबाहेर पावणे अकरा वाजता सभा घेत भाजप सभेवर बहिष्कार घालत असल्याचे जाहीर केले. यावेळी संतोष वालावलकर, दादा साईल, देवेंद्र सामंत आदी उपस्थित होते. यावेळी आमदार राणे म्हणाले, "राज्याचे वित्तमंत्री अजित पवार जिल्हा दौऱ्यावर आलेले असताना जिल्हा परिषदेचे मागे गेलेले 46 कोटी पुन्हा देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात राज्य शासनाने ते दिलेले नाहीत. जिल्हा नियोजन समिती सभेत जिल्हा विकासाची विधायक चर्चा होणे गरजेचे आहे. तेथे निर्णय झाले पाहिजेत. कामांना चालना देणे अपेक्षित असते; परंतु जिल्ह्याचा विकास सध्या ठप्प झालेला आहे. जिल्हा नियोजनच 13 कोटींचा केवळ पहिला हप्ता आला आहे."

Nitesh Rane
Video: Sarkarnama Face-Off Full Episode महाराष्ट्रातील राजकारणातील ड्रामा क्वीन कोण? पहा तरुण नेत्यांचा Faceoff

कामांच्या याद्या नियमबाह्य
कामांच्या याद्या नियमबाह्य पद्धतीने बनविल्या जात आहेत. मंजूर केलेल्या यादीवर केवळ पालकमंत्री यांची स्वाक्षरी आहे. त्या यादीवर जिल्हाधिकारी यांचीही स्वाक्षरी असणे बंधनकारक आहे. याचा अर्थ पालकमंत्री यांचा कारभार जिल्हाधिकारी यांनाही मान्य नाही. पुरहानी यादी करताना विश्वासात घेतलेले नाही. तौक्ते वादळासह अन्य वादळ नुकसानीचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत. ठेकेदारांनी कामे केली त्याचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे ठेकेदार आर्थिक अडचणीत आले आहेत. परिणामी जिल्ह्यातील रस्ते विकासाची कामे थांबली आहेत, असा आरोप यावेळी श्री. राणे यांनी केला.

कृषी महोत्सवासाठी दबाव
कुडाळ येथे आयोजित केलेल्या कृषी, पशू पक्षी महोत्सवाला गर्दी जमविण्यासाठी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यात आला. त्याचा पुरावा माझ्या जवळ आहे. महोत्सव समारोपानंतर यावर मी बोलणार आहे. शासनाचा पैसा फुकट घालविण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याचा आरोप यावेळी श्री. राणे यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in