बॅंकेतील बाळासाहेब ठाकरेंचा फोटो हटवण्यावरून सामंत म्हणाले...

सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे.
Uday Samant
Uday SamantSarkarnama

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेच्या (Shivsena) वादानंतर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची करण्यात आली होती. या निवडणुकीत राणेंची सरशी झाली असून ते पुन्हा सत्ता मिळवण्यात यशस्वी ठरले आहेत. बॅंकेच्या अध्यक्ष निवडीनंतर अध्यक्षांच्या दालनातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यासह अन्य नेत्यांचे फोटो हटवण्यात आले. यानंतर हा वाद काही थांबायचे नाव घेतांना दिसत नाही. याप्रकरणी आता सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रतिक्रिया देत राणेंचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

Uday Samant
विराट कोहलीच्या राजीनाम्यास शहांच राजकारण जबाबदार?

सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणूक निकालानंतर अध्यक्षांच्या दालनातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) शरद पवार, (Sharad Pawar) सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांचे फोटो हटवण्यात आले आहे. आता या दालनात नारायण राणे यांचा फोटो लावण्यात आला आहे. याप्रकाराबद्दल अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आज (ता.16 जानेवारी) पालकमंत्री सामंतानीही पहिल्यांदा याबाबत आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी राणेंचे थेट नाव न घेता टीका केली आहे. ते म्हणाले, अध्यक्षांच्या दालनातून कोणाचे फोटो हटवले, यापेक्षा वंदनीय बाळासाहेबांचा फोटो तेथून हटवण्यात आला हे दुर्दैवी आहे. याची नोंद सिंधुदुर्गातील आणि राज्यातील लोक घेतील. त्यामुळे याबाबत मला फार काही बोलायचे नाही. ही कशा प्रकारची प्रवृत्ती असू शकते याचा प्रत्यय आला आहे, अशा शब्दाच सामंतानी अप्रत्यक्षपणे राणेंचा समाचार घेतला.

Uday Samant
ज्या आमदारासाठी योगींनी भाजपला धक्का दिला, त्याचंच स्वत:साठी तिकीट कापलं!

दरम्यान, शिवसेना आमदार राजन साळवी यांना फोनवरून धमकी प्रकरणी सामंत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, साळवी हे आमचे कडवट शिवसैनिक आहेत. ते असल्या पोकळ धमक्यांना घाबरणारे नाहीत. आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत. त्यांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशा प्रकारचे पत्र काल (ता.15 जानेवारी) मी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil ) यांना दिले आहे. त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांना कोणताही धोका होऊ नये, ही सरकारची भूमिका असून सरकार त्यांना सुरक्षा पुरवतील व धमकी देणाऱ्या प्रवृत्तींना ठेचून काढेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com