पहिल्यांदाच आमदार-मंत्री बनलेल्या आदिती तटकरे संसदेत पोचल्या अन्...

राज्यातील पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांसाठी (MLA) संसदेत दोन दिवसांची कार्यशाळा झाली.
Aditi Tatkare
Aditi Tatkare Sarkarnama

नवी दिल्ली : राज्यातील पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांसाठी (MLA) संसदेत दोन दिवसांची कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत ८८ आमदार सहभागी झाले. पहिल्यांदाच निवडून आलेले व मंत्री झालेले राज्यातील ४ आमदार असून, त्यातील आदिती तटकरे (Aditi Tatkare) या एकमेव मंत्री दिल्लीच्या कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या. त्यांनी सर्व सत्रांना हजेरी लावली आणि व्याख्यानांच्या वेळी नोटस् घेणाऱया आदिती तटकरेही यानिमित्ताने दिसल्या. त्यांनी या कार्यशाळेतील अनुभवही सांगितले.

राज्‍याच्या राजशिष्टाचार मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, या कार्यशाळेमुळे केंद्र व राज्यांच्या अखत्यारीतील विकास योजनांची माहिती मिळाली. केंद्र सरकारकडून मिळणारा निधी व त्याचा विनियोग, प्रश्नोत्तर तासाचे महत्व , सुशासन आदी बाबींचीही विस्ताराने माहिती मिळू शकली. अनुभवी मंत्री व लोकप्रतिनिधी यांच्याकडून मिळालेल्या या माहितीमुळे आमदार म्हणून प्रथमच संधी मिळालेल्या माझ्यासारख्या लोकप्रतिनिधींचे ‘व्हीजन' विस्तारण्यास निश्चित मदत होईल.

मी संसदेत (Parliament) पहिल्यांदाच आले नव्हते पण आमदार-मंत्री या नात्याने आता संसद कामकाज पाहताना वेगळा अनुभव मिळाला, असे सांगून आदिती तटकरे म्हणाल्या की, प्रथमच आमदार झालेल्या लोकप्रतिनिधींना दिल्लीचे कामकाज कसे चालते, हे पाहता आले. राज्याबरोबर केंद्राचे परस्परसंबंधांची माहिती यात मिळाली असून, ती उपयुक्त ठरेल. व्याख्याने व प्रत्यक्ष काम करताना येणारे अनुभव यात फरक असतो, पण या निमित्ताने लोकप्रतिनिधींच्या दृष्टीकोनात फरक पडतो. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाजही नवीन आमदारांना पाहता आले. सदनातील गोंधळाचे अपवाद वगळता वाद पूर्णतः राजकीय असतात. त्यात वैयक्तिक कटुता येऊ देऊ नये हा तर आपल्या महाराष्ट्राचाच संस्कार आहे.

Aditi Tatkare
परळ एसटी डेपोत आढळला कर्मचाऱ्याचा मृतदेह तर आंदोलनातील चौघे बेपत्ता असल्याचा दावा

संसदीय प्रशिक्षण, संदर्भ व प्रशिक्षण विभाग (बीपीएसटी) आणि विधिमंडळाचे वि. स.पागे संसदीय संशोधन केंद्र यांच्या वतीने राज्यातील नवनिर्वाचित आमदारांसाठी नुकतीच कार्यशाळा झाली. यासाठी १२० आमदारांनी नोंदणी केली होतीव त्यातील ८८ आमदार यात सहभागी झाले होते. या कार्यशाळेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड, रामदास आठवले यांच्यासह माजी मंत्री प्रकाश जावडेकर व अरविंद सावंत तसेच कुमार केतकर, प्रियांका चतुर्वेदी या लोकप्रतिनिधींनी दिल्लीतील आपले अनुभवही राज्याच्या आमदारांबरोबर शेअर केले.

Aditi Tatkare
कोरोनाच्या बूस्टर डोसची मोहीम सुरू होण्याच्या 24 तास आधी जनतेला मिळाली 'गुड न्यूज'

तसेच, लोकसभेतील अभ्यासू खासदार भर्तुहरी माहताब व मनोज झा यांनीही या आमदारांशी संवाद साधला. प्रश्नोत्तराचा तास, संसदीय लोकशाहीचा गाभा, जागतिक तापमानवाढीवर भारत सरकार व संसद सदस्यांची भूमिका यावर त्यांनी मार्गदर्शन झाले. आता यापुढे बाहेरच्या राज्यांतील खासदारांशीही राज्यातील नवनिर्वाचित आमदारांचा संवाद व्हावा, अशी अपेक्षाही तटकरे यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in