हितेंद्र ठाकूरांच्या फटकेबाजीने अनेकजण घायाळ; निधी वाटपावरून केले अजितदादांचे अभिनंदन

आज दिवसभर पावसाबरोबर With Rain हितेंद्र ठाकूर Hitendra Thakur यांच्या भाषणाचीच वसई विरारमध्ये Wasai Virar चर्चा सुरु होती.
Hitendra Thakur, Ajit Pawar
Hitendra Thakur, Ajit Pawarsarkarnama

विरार : राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यानी विश्वास दर्शक ठराव जिंकल्यानंतर अभिनंदनाच्या प्रस्तावर बोलताना हितेंद्र ठाकूर यांनी चांगलीच राजकीय फटकेबाजी केली. त्याचवेळी त्यांनी निधी वाटपाबाबत बोलताना अजित पवार यांचे अभिनंदन करून बंडखोर आमदारांच्या निधी वाटपाबाबतच्या भूमिकेला छेद देण्याचे काम केले त्याचीच चर्चा वसई विरारमध्ये सुरु आहे. यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी नव्या मुख्यमंत्र्यांकडून पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली.

मुख्यमंत्रीच्या अभिनंदन प्रस्तावर बोलताना त्यांनी चौफेर फटकेबाजी करताना सांगितले कि, राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी जे झाले ते बरोबर नव्हते . निवडणुकी नंतर आता झालेले सत्तांतर यामध्ये झालेली चर्चा बरोबर नव्हती. आमच्या पक्षाच्या आमदारांची नावे घेऊन टीका करण्यात आली. आम्ही कोणाच्या गोट्यातल्या गाई नाहीत. किंवा कोणाच्या दावणीतील आमदार नाहीत.

Hitendra Thakur, Ajit Pawar
Video: पुढचा घोडेबाजार महालक्ष्मी रेसकोर्सला करू- हितेंद्र ठाकूर

आमचा पक्ष आम्ही आमच्या पद्धतीने चालवतो. शब्द पण आमच्या पद्धतीने देतो. चांगल्या पद्धतीने सांगण्या सारख्या गोष्टीत टीका करण्यात आली . घोडे बाजाराचा उल्लेख हि करण्यात आला. आज पर्यंतच्या राजकारणात मी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप यांना मते देत आलो आहे. परंतु माझयावर कधी शिंतोडे उडले नाहीत यावेळी मात्र ते उडले. अशी टीका त्यांनी नाव न घेता सेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर केली.

Hitendra Thakur, Ajit Pawar
16 लेडीज बार तोडणारा मी एकनाथ शिंदे आहे...

तर दुसऱ्या बाजूला ठाकूर यांनी आमदारांना निधी मिळत नव्हता अशी टीका सेनेच्या बंडखोरांनी अजित दादा पवार यांच्यावर केली होती. त्यावर बोलताना त्यांनी सांगितले कि, आम्हाला अजित पावर यांनी सातत्याने निधी दिल्याचे सांगून बंडखोर आमदारांच्या भूमिकेला छेद देण्याचे काम केले. संघटना आणि सरकार यात फरक ठेवा ,एक संघटना म्हणून सरकार चालत नाही याचेही भान ठेवायला लागेल.

Hitendra Thakur, Ajit Pawar
Ajit Pawar : अजित पवार म्हणतात, मुख्यमंत्रीच शिवसेनेचा तर सरकार अल्पमतात कसं?

सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जायचे आहे. याकडे लक्ष ठेवा असे सांगितले. त्याच वेळी पालघर जिल्ह्यावर सातत्याने अन्याय झाला आहे. मुख्यमंत्री म्हणून ज्या विकासाच्या योजना राबविणार आहात ते सांगितले. रिंग रोड, इफ्राट्रक्चर हे करताना त्यावेळच्या ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा वेगळा झाल्यावर आमच्यावर अन्याय करण्यात आला आहे.

Hitendra Thakur, Ajit Pawar
आर्यन खान प्रकरणातील किरण गोसावी आता पालघर पोलिसांच्या कोठडीत

आदिवासी, मच्छीमार यांना न्याय देतानाच नव्याने वानरे नागरीकरण याला हि न्याय द्यावा लागणार आहे. ट्रॅफिक वाढली आहे. मुंबई ठाण्याच्या पलीकडे हि जग आहे. आमच्याकडे पण मेट्रो द्या , तुमच्याकडून अपेक्षा आहेत. तुम्ही दिलेला शब्द पूर्ण करतील अशी खात्री आहे. असे सांगून त्यांना कोपरखळी मारली. त्यामुळे आज दिवसभर पावसाबरोबर हितेंद्र ठाकूर यांच्या भाषणाचीच वसई विरार मध्ये चर्चा सुरु होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com