दोन आमदार आणि दोन माजी आमदार, अशा चार नेत्यांच्या बुद्धिची कसोटी लागणार!

चिपळूण तालुक्यात जिल्हा परिषदेचे ९ गट व १८ पंचायत समितीचे गण येतात.
Bhaskar Jadhav, Shekhar Nikam, Ramesh Kadam, Sadanand Chavan
Bhaskar Jadhav, Shekhar Nikam, Ramesh Kadam, Sadanand Chavansarkarnama

चिपळूण : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे चिपळुणात (Chiplun) राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. चिपळूणच्या राजकारणात सक्रीय असलेल्या सर्वच नेत्यांची ताकद आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Local body elections) पणाला लागणार आहे. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पालिकेत आपले कार्यकर्ते निवडून आण्यासाठी या नेत्यांचा कस लागणार आहे. यातून चिपळुणात कोणत्या पक्षाचे वर्चस्व आहे, हेही सिद्ध होणार आहे. (Local body elections accelerate political developments in Chiplun)

Bhaskar Jadhav, Shekhar Nikam, Ramesh Kadam, Sadanand Chavan
रामदास कदमांना शिवसेनेने भरभरून दिलंय; सुनील शिंदेंची उमेदवारी योग्यच!

चिपळूण तालुक्यात जिल्हा परिषदेचे ९ गट व १८ पंचायत समितीचे गण येतात. चिपळुणमधील काही भाग गुहागर मतदारसंघात जोडलेला आहे. आमदार शेखर निकम यांनी विधानसभा निवडणुकीत सर्वच गटातून मताधिक्य मिळाले होते. निवडून आल्यानंतर निकम यांनी कार्यकर्ते आणि मतदारांशी कायमचा संपर्क ठेवला आहे. शिवसेना, भाजप आणि कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्येही निकम यांच्याबद्दल मत चांगले आहे. महापुराच्या काळात पक्ष न बघता निकमांनी मदत केली. मात्र, आता आमदार रमेश कदम निवडणुकीत सक्रीय झाले आहेत. याचा फायदा राष्ट्रवादीला किती होणार, हे या निवडणुकीत स्पष्ट होईल. स्थानीक पातळीवर राष्ट्रवादीत अंतर्गत धुसफुस फारशी नाही. विद्यमान आमदार शेखर निकम आणि माजी आमदार रमेश कदम एकमेकांच्या विचाराने चालत आहेत. कोणाच्याही समर्थकाला उमेदवारी मिळाली तरी तो कार्यकर्ता राष्ट्रवादीचाच असल्यामुळे कॉंग्रेसबरोबर आघाडी करणे आणि निवडणुकीला सामोरे जाणे एवढेच राष्ट्रवादीला करावे लागणार आहे.

चिपळूणातील महापुरानंतर माजी आमदार सदानंद चव्हाण सक्रीय झाले आहेत. पक्षाकडून तसेच राज्यातील शिवसेनेच्या नेत्यांकडून आलेली मदत त्यांनी शहर आणि ग्रामीण भागात पोहचवली. विविध विकास कामांचे भूमिपूजन, उदघाटन आणि पक्षाचे मेळावे घेत ते तालुक्यात सक्रीय झाले आहेत. त्यामुळे पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे उमेदवार ठरवताना निश्चित त्यांना विश्वासात घेतले जाईल. पालिका निवडणुकीसाठी शहरात राबणारी शिवसेनेची वेगळी यंत्रणा आहे. ही यंत्रणा शहराच्या राजकारणात कोणाचाही हस्तक्षेप खपवून घेत नाही. माजी आमदार चव्हाण यांचे मतदारांशी आणि कार्यकर्त्यांशी थेट संपर्क असल्यामुळे पालिका निवडणुकीत आपल्या मताला किती महत्त्व आहे, याची जाणीव करून देण्यास चव्हाण यांनी सुरवात केली आहे. निवडणुकीच्या पार्शभूमिवर शहरात शिवसेनेच्या बैठका झाल्या, त्यात माजी आमदार सदानंद चव्हाण दिसले नाही. ही बाब कार्यकर्त्यांना खटकली. त्यांनी शहरातील नेत्यांना ती बोलून दाखवली आहे.

Bhaskar Jadhav, Shekhar Nikam, Ramesh Kadam, Sadanand Chavan
तटकरेंनी शब्द पाळावा; त्यांच्या उमेदवारांच्या पाठीशी माझी व शिवसेनेची ताकद उभी करेन!

..तर राष्ट्रवादीला मोठा संघर्ष क्रमप्राप्त

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी दहा वर्षे चिपळूणचे नेतृत्व केले आहे. शहर आणि ग्रामीण भागात त्यांचेही वजन आहे. महापुराच्या काळात प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. जीवनावश्यक वस्तू मिळवून देणे, शहराची स्वच्छता यामध्ये जाधव यांनी लक्ष घातले होते. आमदार जाधव यांच्यावर शिवसेनेने चिपळूणची जबाबदारी सोपवली तर राष्ट्रवादीला जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल.

चार नेत्यांभोवती फिरते राजकारण

मागील काही वर्षे चिपळूणचे राजकारण आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम आणि सदानंद चव्हाण यांच्या भोवती फिरत आहे. इतर पक्षात नेते तयार होत आहेत. मात्र, चिपळूणच्या राजकारणाची दिशा बदलण्याएवढी ताकद या चार नेत्यांशिवाय इतर कोणामध्ये सध्या तरी नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे चार नेते आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील. शिवसेनेत निवडणुकीची जबाबदारी कोणावर द्यायची, या निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. माझ्याकडे चिपळूणची जबाबदारी आली तर ती घेण्यासाठी मी तयार आहे.

असे भास्कर जाधव यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी कॉंग्रेसबरोबर आघाडीची बोलणी करत आहेत. आमदार शेखर निकम यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी एक दिलाने काम करत आहेत, असे रमेश कदम यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com