राज ठाकरेंच्या सभेला अल्प प्रतिसाद; खुर्च्या उचलण्याची वेळ : पत्रकारांनाही सभागृहाबाहेर काढले

Raj Thackeray News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत
Raj Thackeray News
Raj Thackeray NewsSarkarnama

लांजा (जि. रत्नागिरी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. रत्नागिरीतील लांजा येथे अजिंक्य मंगल कार्यालयात कार्यकर्ता, पदाधिकारी मेळावा झाला. यावेळी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. (Raj Thackeray News)

राज ठाकरे आणि गर्दी हे समीकरण आहे. मात्र, अनेक दिवसानंतर कोकण दौऱ्यावर गेलेल्या राज ठाकरेंच्या दौऱ्याला तितकासा प्रतिसाद मिळत नाहीये. लांजा येथील कार्यकर्ता मेळाव्याला अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला. अवघे पन्नास ते शंभर कार्यकर्ते येथे उपस्थित राहिल्याने पत्रकारांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगण्यात आले. लांजामध्ये मनसेची (MNS) संघटना अत्यंत कमकुवत आहे. त्या संघटनेला बळ देण्यासाठी स्वता: राज ठाकरे येथे आले होते. मात्र, त्यांनाही अत्यंत अल्प प्रतिसाद मिळाला.

Raj Thackeray News
Shivsena : ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या ; आता दोन बड्या नेत्यांना अँटी करप्शनची नोटीस!

येथे मंगल कार्यालयामध्ये अवघ्या, 100 ते 150 खुर्च्या मांडण्यात आल्या होत्या. त्यातीलही अनेक खुर्च्या उचलाव्या लागल्या. तसेच राज ठाकरे यांच्यासोबत मुंबई आणि कोकणातील इतर ठिकाणचे कार्यकर्ते उपस्थित होते. तेच कार्यकर्ते कार्यालयात बसले. यावेळी पत्रकारांना कार्यालयाच्या बाहेर जाण्यास सांगण्यात आले. राज ठाकरे म्हणाले, मी उद्या सकाळी बोलतो. राज ठाकरे राजापूरवरुन लांजाला आले होते, लांज्याच्या हद्दीमध्ये गाडीमधेही थांबल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

यावेळी ठाकरे कार्यकर्त्यांना म्हणाले, ''आगामी काळात आपल्याला पक्षसंघटना अधिक मजबूत करायची आहे. या पक्षसंघटना वाढीमध्ये आडवं कोणी येईल त्याला तुडवून पुढे जा. मात्र, पक्ष संघटना बांधणी करा. यासाठी तुमच्या मदतीला वकिलांची फौज उभी करेन, असे आश्वासन त्यांनी दिले. ठाकरे यांनी खास ठाकरे शैलीत पक्ष संघटना वाढीचे आदेश दिले.

आगामी काळात रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्याला पक्ष संघटना मजबूत करायची आहे, असे ते म्हणाले. पक्ष संघटना वाढ करत असताना जो कोणी मध्ये येईल त्याला तुडवून पुढे जा; मात्र, संघटना मजबूत करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी निर्माण झालेला पक्ष आहे, त्यामुळे जनतेमध्ये विश्वास निर्माण करा. त्यासाठी पक्षमार्फत लागेल ती मदत केली जाईल'', असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले.

Raj Thackeray News
MNS Pune : मनसेचा वसंत मोरेंना पुन्हा धक्का! समर्थक पदाधिकाऱ्याची हकालपट्टी

या वेळी राज ठाकरे यांच्यासोबत पक्षाचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar), नितीन सरदेसाई तसेच रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर, रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष मनीष पाथरे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com