शिवसेनेच्या आजच्या राजकीय परिस्थितीला कुणबी सेनेची हाय लागली...

Vishwanath Patil : कोकणात १९८२ पर्यंत कुणबी समाजाचे आमदार, खासदार विजयी व्हायचे...
Vishwanath Patil & Uddhav Thackeray Latest News
Vishwanath Patil & Uddhav Thackeray Latest News Sarkarnama

चिपळूण : कुणबी समाज शिवसेनेचा मुख्य गाभा असूनही या समाजाचा फायदा उठवला गेला. सध्याच्या शिवसेनेच्या राजकीय परिस्थितीला कुणबी समाजाची हाय लागली आहे.

शिवसेनेने (Shivsena) नव्हे; तर इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनीही गेल्या ३० वर्षांत या समाजाचा राजकीय फायदा उठवला. राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीदेखील दिलेला शब्द मोडला. त्यानंतरच्या सरकारने देखील या समाजाची दिशाभूल केली, असा आरोप कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील (Vishwanath Patil) यांनी केला. (Vishwanath Patil & Uddhav Thackeray Latest News)

Vishwanath Patil & Uddhav Thackeray Latest News
उद्धव ठाकरेंचा उजवा हात जेलमध्ये,आता डावाही जाणार;`समझनेवाले को इशारा काफी है`

समाजातील सर्वात मोठा वर्ग असलेल्या कुणबी समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी आहे. त्यासाठी दोन महिने राज्यव्यापी निर्धार परिषद राबवली जाणार असल्याची माहितीही पाटील यांनी चिपळूणमध्ये दिली.

कुणबी सेना व बहुजन विकास आघाडी यांची स्वतंत्र आरक्षणासाठी राबवण्यात येणाऱ्या निर्धार परिषदेच्या पार्श्वभूमीवर संयुक्त बैठक झाली. या वेळी सुरेश भायजे, राजाभाऊ कातकर, दादा बैकर, डॉ. विकास पाटील, संदेश गोरिवले, संजय जाभरे आदी उपस्थित होते. कुणबी सेनेच्या स्थापनेपासून समाजाच्या विविध मागण्यांसाठी लढा सुरू आहे. शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ हे त्याचेच फलित आहे. परंतु राज्यातील एकूण कुणबी समाजाचा विचार करता महामंडळास दिलेला ५० कोटींचा निधी अपुरा आहे. या महामंडळाची अत्यंत घाईघाईने रचना केली असून त्यात अनेक त्रुटी आहेत. कोकणात १९८२ पर्यंत कुणबी समाजाचे आमदार, खासदार विजयी व्हायचे, परंतु नंतर राजकीय परिस्थिती बदलत गेली, असेही पाटील म्हणाले.

Vishwanath Patil & Uddhav Thackeray Latest News
सगळ्यांच्या चिठ्ठ्या माझ्याकडे : `50 खोके, ओक्केवर` मुख्यमंत्र्यांचा सूचक इशारा...

ओबीसीमध्ये समावेश केल्याने कुणबी समाजाला न्याय मिळत नाही. याविषयी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कुणबी समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची आग्रही मागणी केली आहे. त्यासाठी राज्यभर निर्धार परिषदा घेतल्या जाणार आहे. त्याची सुरुवात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून केली जाईल, असेही पाटलांनी स्पष्ट केले.

शिवसेनेला भरभरून देऊनही दुर्लक्ष

दरम्यान, शेती अडचणीत आल्याने त्याचा सर्वार्धिक फटका कुणबी समाजाला बसतो. आतापर्यंतच्या सर्वच मुख्यमंत्र्याकडे त्याबाबतचे गाऱ्हाणे मांडूनही तो प्रश्न सुटलेला नाही. शिवसेनेला तर या समाजाने भरभरून दिले. परंतु शिवसेना सरकारने देखील या समाजाची दखल घेतली नाही. समाजाच्या पदाधिकाऱ्यांचा वापर केला. मात्र आता कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठी समाज जाणार नाही, असेही यावेळी त्यांनी जाहीर केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com