केसरकर आता 'विश्वप्रवक्ता' असल्यासारखेच वागताहेत....निलेश राणे

राणेंच्या Rane दोन्ही मुलांनीच सिंधुदुर्ग Shindhudurg आणि कोकणातील Kokan दीपक केसरकर Deepak Kesarkar यांचे राजकारण Politics संपवले होतं. २०२४ पर्यंत आम्ही त्यांना गोव्यातच Goa पाठवणार होतो.
Nilesh Rane, Deepak Kesarkar
Nilesh Rane, Deepak Kesarkarsarkarnama

सिंधुदुर्ग : राणेंच्या दोन्ही मुलांनी सिंधुदुर्ग आणि कोकणातील दीपक केसरकर यांचे राजकारण संपवले होते. २०२४ पर्यंत आम्ही त्यांना गोव्यातच पाठवणार होतो. शिंदेसाहेबांमुळे ते राजकारणात पुन्हा जिवंत झाले असून त्यांच्या गटाचे प्रवक्ते असेल तरी ते 'विश्वप्रवक्ता' असल्यासारखे वागत आहेत. कदाचित ते बोरीस जॉनसन यांनाही आम्ही समजावले होते, असे सांगतील, अशा शब्दात भाजपचे नेते निलेश राणे यांनी केसरकरांची खिल्ली उडवली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना व भाजप युतीचे सरकार सत्तेत येऊन काही दिवस उलटतात तोच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आणि राणे कुटुंबीयांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा केसरकर यांच्यावर हल्ला चढवला आहे.

Nilesh Rane, Deepak Kesarkar
केसरकर लायकीपेक्षा जास्त बोलू नका : लहान मुलगा म्हणाल्याने निलेश राणे खवळले..

एका वृत्तवाहिनीशी बोलताना निलेश राणे म्हणाले, राणेंच्या दोन्ही मुलांनीच सिंधुदुर्ग आणि कोकणातील दीपक केसरकर यांचे राजकारण संपवले होतं. २०२४ पर्यंत आम्ही त्यांना गोव्यातच पाठवणार होतो. जेणेकरून कोकणात दीपक केसरकर नावाचा कोणता आमदार होता, हे लोकांच्या लक्षातही राहिले नसते. मात्र, आता योगायोगाने त्यांचे राजकारण जिवंत झाले आहे. आता त्यांनी जमिनीवर राहावे, उगाच उडू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

Nilesh Rane, Deepak Kesarkar
उद्धव ठाकरेंनी वडिलकीच्या नात्याने त्यांना जवळ घ्यावे... दीपक केसरकर

राणे पुढे म्हणाले, केसरकरांना त्यांच्या मतदारसंघात २५ माणसेही विचारणार नाहीत. अशी त्यांची मतदारसंघात अवस्था आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. त्यांच्या ताब्यात एकही नगरपालिका किंवा नगरपंचायत नाही. शिंदे साहेबांमुळे त्यांना राजकीय कुबड्या मिळाल्या आहेत. आम्ही एकनाथ शिंदे यांच्यावरील प्रेमापोटी त्यांच्यासोबत आहोत. खरंतर दीपक केसरकर यांना बोलायची गरज नव्हती.

Nilesh Rane, Deepak Kesarkar
Shindhudurg : माझे मंत्रिपद गेले तरी चालेल : केसरकर यांची राणेंना गुगली...

तरी त्यांनी स्वत:चा शहाणपणा गाजवायचा प्रयत्न केला. आपण युतीत आहोत. आम्हाला जेवढी तुमची गरज आहे, तेवढीच तुम्हालाही आमची गरज आहे, हे केसरकर यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा ही श्री. राणे यांनी दिला. दीपक केसरकर हे शिंदे गटाचे प्रवक्ते आहेत. त्यांना भाजपच्या लोकांवर बोलायचा अधिकारी नाही. आम्ही त्यांची दखलही घेत नाही.

Nilesh Rane, Deepak Kesarkar
`राणेंची मुलं लहान आहेत; त्यांना फडणवीस योग्य समज देतील...`

आता कुठे दीपक केसरकर बोलायला शिकले आहेत. मात्र, ते कधीकधी भरकटतात. ते शिंदे गटाचे प्रवक्ते असले तरी ते विश्वप्रवक्ता असल्यासारखे बोलत आहेत. कदाचित ते बोरीस जॉन्सनलाही आम्ही समजावले होते, असे सांगतील, अशा शब्दात श्री. राणे यांनी केसरकरांची खिल्ली उडवली. राणे साहेबांविषयी काही बोलले तरी आम्ही ऐकून घेणार नाही. उद्या केसरकर मंत्री झाले तरी आम्हाला फरक पडत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्याचा फटका बसणार नाही, असेही निलेश राणे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com