Shashikant Warise : पत्रकार वारिसे मृत्यू प्रकरण; आंबेरकरची 'नार्को टेस्ट' करण्याची राऊतांची मागणी

Vinayak Raut : आंदोलंकांकडून आरोपीस फाशीची शिक्षा देण्याची मागणी
Vinayak Raut, Pandharinath Amberkar
Vinayak Raut, Pandharinath AmberkarSarkarnama

Nanar Refinery : पत्रकार शंशिकांत वारिसे यांचा अपघात नसून रिफायनरी समर्थकांनी खून झाल्याचा आरोप नागरिकांसह खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. त्यातच आता विनायक राऊत यांनी या प्रकरणातील आरोप पंढरीनाथ आंबेरकरांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात ते सोमवारी रत्नागिरी पोलीस अधिक्षकांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पत्रकार शशिकांत वारिसे (Shashikant Warise) यांच्या मृत्यूनंतर रिफायनरी समर्थक आणि रिफायनरी विरोधक यांच्यातील वाद चिघळला आहे. त्यातूनच आज रिफायनरी विरोधकांनी राजपूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता.

Vinayak Raut, Pandharinath Amberkar
Sanjay Raut News : पत्रकार वारिशे मृत्यू प्रकरणी राऊतांचे शिंदे गटातील मंत्र्यावर गंभीर आरोप; फोटोच केला ट्वीट

हा मोर्चा बाजारपेठेतून पुढे तहसीलवर धडकला. तेथे अंदोलकांनी वारिसे यांना न्याय मिळत नाहीत तोपर्यंत रस्त्यवार उतरणार, अशी भूमिका घेतली. तसेच अंदोलनाकांनी वरीसेच्या मृत्यूतील आरोपींना फाशी देण्याची मागणी केली. या मोर्चात खासदार विनायक राऊत (Vinayk Raut) यांच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही राजकीय नेत्यांनी सहभाग घेतला नसल्याची माहिती आहे. मोर्चात महिलांची संख्या लक्षणीय होती.

Vinayak Raut, Pandharinath Amberkar
Shashikant Warise : वारीसे मृत्यू प्रकरणी शिंदे-फडणवीसांचा मोठा निर्णय ; पोलिसांना दिला 'हा' आदेश

या मोर्चानंतर खासदार राऊत यांनी पंढरीनाथ आंबेरकराची (Pandharinath Amberkar) शशिकांत वारिसे यांच्या मृत्यूप्रकरणी नार्को टेस्ट (Narco Test) करण्याची मागणी केली. त्याबाबत राऊत सोमवारी रत्नागिरी पोलीस अधिक्षकांची भेटणार आहेत. यापूर्वीही राऊत यांनी अंबेरकरांवर आरोप केले आहेत. आंबेरकर यांनी यापूर्वी रिफायनरीला विरोध करणाऱ्यांच्या अंगावर वाहन चालवून ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

Vinayak Raut, Pandharinath Amberkar
Rajesh Tope News : त्यांना म्हणायचे होते `संत` एकनाथ, पण घोळ झाला..

वारिसे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बॅनरवर कुख्यात गुडांचे फोटो, अशी बातमी व्हायरल केल्यानेच त्यांचा घातपात केला आहे, असा आरोपही ग्रामस्थांसह राऊत यांनी केला. राऊत यांनी देशातील काही भागात मोठे प्रकल्प राबविताना स्थानिक गुंडाच्या माध्यमातून धमकावून जीवे मारण्याचे प्रयत्न केले जात असल्याचेही म्हणाले आहेत.

Vinayak Raut, Pandharinath Amberkar
Ajit Pawar News : नऊ महिन्यात बाळ जन्माला येतं, यांना मंत्रीमंडळ विस्तार करता येईना..

राऊत यांनी सांगितले होते की, आपघातातील चालक पंढरीनाथ आंबेरकर नाणार रिफायनरीचे समर्थक आहेत. या रिफायनरीला सर्वात जास्त जमिनी मिळवून देण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याने एका मुलावर गाडी चालवून अपघात घडविला होता.

राजपूर न्यायालयातही रिफायनरीला विरोधकांवर दगडफेक केली. तसेच कोर्टातच ठार मारण्याची धमकीही दिली होती. त्यानुसार राजापूर पोलीस (Rajapur Police) ठाण्यात आंबेरकरावर गुन्हे दाखल असल्याची माहितीही राऊत यांनी दिलेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com