आगामी निवडणुकीत आमचे ५० चे १०० आमदार होतील; उदय सामंत यांचा दावा

Uday Samant| भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी संघटना वाढीसाठी वक्तव्ये केली असतील
Uday Samant|
Uday Samant|

रत्नागिरी : ''मुख्यमंत्री केवळ रत्नागिरीत येत आहेत असे नाही, हा त्यांचा संघटानात्मक दौरा आहे. प्रत्येकाला स्वत:चा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांला मॉरल सपोर्ट देण्याची भूमिका असते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) यांनाही पक्षांना आपला पक्ष वाढवायचा आहे. आज आमचे 55 आमदार आहेत, ते पुढच्या विधानसभेला 100 होतील, असा दावा शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी केला आहे. महाराष्ट्रातील जनता स्वंयस्फूर्तीने एकनाथ शिंदे यांना भेटायला येत असते. या सर्वांची प्रचिती महाराष्ट्राच्या विकासात दिसेल, असंही त्यांनी सांगितलं.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांनी संघटना वाढीसाठी वक्तव्ये केली असतील, अनेकदा अशी वक्तव्ये चोवीस तासात बदलली आहेत. हे आपण पाहिलं आहे. त्याच प्रमाणे जर जे.पी. नड्डा यांनी अशी वक्तव्ये केली असतील तर त्यांच्या पक्षापुरती मर्यादित आहे. त्यामुळे आगामी निवडणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात आमचे ५० चे १०० आमदार होतील अशी आम्हाला खात्री आहे, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.

Uday Samant|
राष्ट्रवादीचे दोन मंत्री आधीच जेलमध्ये, तिथेही युती हवी, म्हणून संजय राऊत गेले..

एकनाथ शिंदे यांनी केलेल्या उठावात मीही सामील झालो. शिवसेनेला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या तावडीतून सोडवण्यासाठी मी हा निर्णय घेतला. पण विनायक राऊत यांना ते मान्य नाही. म्हणून त्यांनी माझ्यावर टीका असावी, पण मी त्याचा राग मानत नाही. आश्चर्य याच वाटतं की जे लोक विनायक राऊतांचा निवडणुकीत पराभव होण्यासाठी प्रयत्न करत होते, त्यांनीही काल व्यासपीठावर निष्ठा व्यक्त केली. त्यांनाही मला काही बोलायचं नाही. पण आजही मी शिवसेनेतच आहे. त्यामुळे मी कोणाच्या टीकेला उत्तर देणार नाही. मला राऊतसाहेबांनी अनेकदा मदत केली आहे. ते मी कधीच विसरणार नाही, असं उदय सामंत यांनी सांगितलं. तसेच, विनायक राऊत यांचा गैरसमजही काही दिवसात दूर होईल, असा विश्वासही सामंत यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in