सिंधुदुर्गात साताऱ्याची पुनरावृत्ती : अजित पवारांचे ते विधान खरे ठरले!

एक निकाल चिठ्ठीवर ठरला, तर दोघांना एका मताने पराभूत व्हावे लागले
Ajit Pawar

Ajit Pawar

sarkarnama

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक प्रचारासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बोलताना ‘दक्ष राहा, साताऱ्यात समान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे निकाल द्यावा लागला, तर एका मताने दोन उमेदवारांचा पराभव झाला आहे,’ असे महाविकास आघाडीच्या नेत्यांना बजावून सांगितले होते. आज (ता. ३१ डिसेंबर) निकालादिवशी नेमके पुन्हा तसेच घडले. महाविकास आघाडी पॅनेल प्रमुख सतीश सावंत यांना टायनंतर पराभव स्वीकारावा लागला, तर भाजपच्या (BJP) गुरुनाथ पेडणेकर व प्रकाश गवस यांना केवळ एका मताने पराभव स्वीकारावा लागला आहे. (In Sindhudurg statement of Deputy Chief Minister Ajit Pawar came true)

जिल्हा बँक निवडणूक यावेळी वादळी झाली. शिवसैनिक हल्ला प्रकरणानंतर या निवडणुकीने ट्रॅक बदलला. सहकाराच्या विकासाऐवजी वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. भाजपच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे, आमदार प्रसाद लाड, माजी खासदार नीलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली तर महाविकास आघाडीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, पॅनेल प्रमुख सतीश सावंत तसेच शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तसेच जिल्ह्यातील या तिन्ही पक्षाची यंत्रणा काम करीत होती, त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली होती. भाजप नेते आपण सत्ता पुन्हा खेचून आणणार, असे सांगत होते. तर महाविकास आघाडीचे नेते सत्ता राखणारच असे सांगत होते. मात्र, यात भाजपचे म्हणणे खरे ठरले आहे. महाविकास आघाडीला आठ संचालकांवरच समाधान मानावे लागले.

Ajit Pawar

सिंधुदुर्ग बॅंकेत १५ नव्या चेहऱ्यांची एन्ट्री : दोन्ही पॅनेलप्रमुखांसह दहा संचालकांचा पराभव

कणकवली मतदार संघात एकूण 35 मतदारांपैकी शिवसेनेच्या सतीश सावंत यांना 17, तर भाजपचे विठ्ठल देसाई यांना 17 मते पडली 1 मत फेटाळण्यात आले. चिठ्ठीद्वारे विठ्ठल देसाई यांना विजयी घोषित केले. देवगड मतदार संघात एकूण 36 मतदारांपैकी अविनाश माणगावकर यांना 17 तर भाजपचे प्रकाश बोडस यांना 19 मते (विजयी), वैभववाडी मतदार संघात एकूण 20 मतदारांपैकी शिवसेनेच्या दिगंबर पाटील यांना 9 तर भाजपचे दिलीप रावराणे यांना 11 मते (विजयी), मालवण मतदार संघात एकूण 30 मतदारांपैकी राष्ट्रवादीचे व्हिक्टर डाटस यांना 19 (विजयी) तर भाजपचे कमलाकांत कुबल यांना 11 मते, कुडाळ मतदार संघात एकूण 37 मतदारांपैकी काँग्रेसचे विद्याप्रसाद बांदेकर यांना 20 मते, भाजपचे प्रकाश मोर्ये यांना 15 तर अपक्ष सुभाष मडव याना 1 मत पडले. 1 मत फेटाळण्यात आले.

Ajit Pawar

जानकरांच्या मनात काय चाललय? ठाकरे सरकारचे केले कौतुक

वेंगुर्ला मतदार संघात 21 मतदारांपैकी काँग्रेसचे विलास गावडे यांना 8 तर भाजपचे मनीष दळवी यांना 13 मते पडली. सावंतवाडी मतदार संघात 33 मतदारांपैकी शिवसेनेच्या विद्याधर परब यांना 17 (विजयी) तर भाजपच्या गुरुनाथ पेडणेकर यांना 16 मते, दोडामार्ग मतदार संघात एकूण 12 मतदारांपैकी शिवसेनेच्या गणपत देसाई यांना 6 तर भाजपच्या प्रकाश गवस यांना 5 मते पडली. 1 मत फेटाळण्यात आले.

Ajit Pawar

आमच्या नेत्यांना केसेसमध्ये अडकवले नसते, तर आम्ही १५ जागा जिंकल्या असत्या : राजन तेली

जिल्हास्तरीय पतसंस्था मतदार संघात एकूण 140 मतदारांपैकी शिवसेनेच्या सुशांत नाईक यांना 76 भाजपच्या राजन तेली याना 63 मते पडली. 1 मत फेटाळण्यात आले. पणन मतदारसंघात एकूण 70 मतदारांपैकी राष्ट्रवादीचे सुरेश दळवी यांना 26 तर भाजपचे अतुल काळसेकर यांना 44 मते पडली. मजूर औद्योगिक संस्था मतदारसंघात एकूण 157 मतदारांपैकी शिवसेनेच्या लक्ष्मण आंगणे याना 70 तर भाजपचे गजानन गावडे यांना 85 मते पडली. 2 मते फेटाळण्यात आली. मच्छीमार व दुग्ध संस्था मतदारसंघात 58 मतदारांपैकी राष्ट्रवादीचे मधुसूदन गावडे याना 26 तर भाजपचे महेश सारंग यांना 32 मते पडली. घरबांधणी देखरेख संस्था मतदार संघात 123 मतदारांपैकी राष्ट्रवादीच्या विनोद मर्गज यांना 54 तर भाजपचे संदीप परब यांना एकूण 70 मते, वैयक्तिक मतदारसंघात 195 मतदारांपैकी काँग्रेसचे विकास सावंत यांना 85 तर भाजपचे समीर सावंत यांना 110 मते पडली.

Ajit Pawar

शरद पवारांच्या दौऱ्यामुळे अशोक पवारांच्या जिल्हा बॅंकेच्या मार्गातील अडथळे दूर!

राखीव असलेल्या पाच मतदार संघातील महिला प्रतिनिधी मतदार संघात एकूण 968 मतदारांपैकी शिवसेनेच्या अनारोजीन लोबो यांना 459, काँग्रेसचे नीता राणे यांना 503, भाजपचे प्रज्ञा ढवन याना 480, भाजपचे अस्मिता बांदेकर याना 456 मते पडली. तर 2 मते फेटाळण्यात आली. अनुसूचित जाती मतदार संघात एकूण 968 मतदारांपैकी राष्ट्रवादीचे आत्माराम ओटवणेकर यांना 506 तर भाजपचे सुरेश चौकेकर यांना 458 मते पडली. 4 मते फेटाळण्यात आली. इतर मागास मतदारसंघात 968 मतदारांपैकी शिवसेनेच्या मनिष पारकर यांना 480 तर भाजपचे रविंद्र मडगावकर यांना 483 मते पडली. 5 मते फेटाळण्यात आली. विमुक्त व भटक्या जमाती मतदार संघात एकूण 968 मतदारांपैकी काँग्रेसचे मेघनाथ धूरी यांना 519 तर भाजपचे गुलाबराव चव्हाण यांना 444 मते पडली. 5 मते फेटाळण्यात आली. अशाप्रकारे एकूण झालेल्या मतदानात 22 मध्ये बाद ठरवण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com