Thackeray Vs Kadam : उद्धव ठाकरेंनी ‘ते’ सिद्ध केले तर मी त्यांच्या घरी भांडी घासेन : रामदास कदमांचे आव्हान

अहो, मी वाघासारखा लढला आहे. कुणाचा ड्रायव्हर म्हणून नोकरी केलेली नाही.
Uddhav Thackeray-Ramdas Kadam
Uddhav Thackeray-Ramdas KadamSarkarnama

खेड : उद्धवजी, मी केशवराव भोसले यांचा ड्रायव्हर होतो, हे तुम्ही सिद्ध केले तर तुमच्या घरी मी भांडी घासेन. नाही तर उद्धवजी तुम्ही माझ्या घरी भांडी घासायला यायल का, असा सवाल माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केला. (If prove that I was Bhosle's driver, I will wash dishes at Uddhav Thackeray's house: Ramdas Kadam)

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची रविवारी खेडमध्ये जाहीर सभा झाला. त्याला रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी आज (ता. ६ मार्च) पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. ते म्हणाले की, मी केशवराव भोसले यांचा ड्रायव्हर होतो, अशी उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. उद्धवजी, मी केशवराव भोसले यांचा ड्रायव्हर होतो, हे तुम्ही सिद्ध केले, तर तुमच्या घरी मी भांडी घासेन. नाही तर उद्धवजी तुम्ही माझ्या घरी भांडी घासायला यायल का?

Uddhav Thackeray-Ramdas Kadam
Uddhav Thackeray Sabha ....हा तर चुना लगाव आयोग : उद्धव ठाकरे निवडणूक आयोगावर जोरदार बरसले

आपण कोणाचं ऐकताय, काय बोलताय. अहो, मी वाघासारखा लढला आहे. कुणाचा ड्रायव्हर म्हणून नोकरी केलेली नाही. केशवराव भोसले यांच्या निवडणुकीच्या वेळेला माझी गाडी..., माझा पैसा..., माझे डिझेल.... काय संबंध कुणाच्या ड्रायव्हरचा, असेही कदम या वेळी म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी अयोध्येचा जो दौरा केला होता, त्या दौऱ्याची सर्व व्यवस्था मी केली होती. सगळी व्यवस्था म्हणजे तुम्हाला कळलं असेल. खासदार संजय राऊत त्याचे साक्षीदार आहेत. आदल्या दिवशी मला उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावून घेतलं आणि सांगितलं की, तुम्ही माझ्यासोबत अयोध्येला यायचं नाही. त्याचं कारण मला काही कळलं नाही, असा गौप्यस्फोटही माजी मंत्री रामदास कदम यांनी केला.

Uddhav Thackeray-Ramdas Kadam
Thackeray On Koshyari : काळी टोपीवाले म्हणत उद्धव ठाकरेंचा कोश्यारींवर हल्लाबोल

ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या सभेला बाहेरून माणसं आणली होती. खेडला शंभर वेळा आला तरी तुम्ही योगेश कदमांना हरवू शकत नाही. मला मीडियाशी बोलायला बंदी करण्यात आली. माझी भाषणं बंद करून टाकली. शिवसेना भवनात उमेदवाराकडून रामदास कदमांची सभा लावावी, म्हणून फोन यायचे, तेव्हा तेवढं नाव सोडून दुसरं कोण पाहिजे ते बोला, असं उत्तर दिलं जायचं.

Uddhav Thackeray-Ramdas Kadam
Uddhav Thackeray : 'चिन्ह' चोरलं तरी जिंकलोच, गद्दारांनी आम्हाला शिवसेना शिकवू नये ; ठाकरेंचा तुफान हल्लाबोल!

उद्धव ठाकरेंचा चेहरा भोळा दिसतो. पण त्या भोळ्या चेहऱ्यामागे अनेक चेहरे लपलेले आहेत, त्याचा साक्षीदार मी आहे. तुम्हाला मी जवळून पाहिलं, तुमची नस ना नस मी ओळखतो, असेही कदम यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com