उद्धव ठाकरेंच्या सभेचं मला निमंत्रण; पण मी जाणार नाही : रामदास कदम

पालकमंत्री अनिल परब यांच्या विरोधात रामदास कदम यांनी रसद पुरवल्याच्या आरोप झाल्याने शिवसेनेचे वरिष्ठ त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती.
Ramdas kadam-Uddhav Thackeray
Ramdas kadam-Uddhav ThackeraySarkarnama

रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा निरोप मला मिळालाय. शिवसेनेच्या (shivsena) ता. १४ मे रोजीच्या सभेचे बोलावणं मला आल्याची जाहीर कबुली शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दिली. मात्र, मी त्या सभेला जाणार नाही. त्यानंतर मात्र मी स्वतः उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचे रामदास कदमांनी सष्ट केलं. (I was invited to Uddhav Thackeray's rally; But I will not go : Ramdas Kadam)

माजी मंत्री रामदास कदम यांनी लिहिलेल्या ‘जागर कदम वंशाचा’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी कदम बोलत होते. या वेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार गजानन कीर्तिकर, शेकापचे जयंत पाटील, मराठा समाजाचे नेते केशवराव भोसले, इतिहास संशोधन मंडळाचे डॉ. सतीश कदम आदी उपस्थित होते.

Ramdas kadam-Uddhav Thackeray
आमदार राऊतांना बारबोले देणार धक्का : पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत करणार प्रवेश!

परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित एका ऑडिओ क्लिपमुळे कदम यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाराज असल्याचे सांगितले जात हेाते. त्यातून त्यांना दसरा मेळाव्यासाठी पक्षाकडून आमंत्रण देण्यात आले नसल्याचे सांगितले जात होते. विशेष म्हणजे कदम यांच्या विधान परिषदेतची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा संधी देण्याबाबत पक्षाकडून अद्याप विचार झालेला नाही, त्यामुळे नेतृत्व रामदास कदमांवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यातच दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीची सूत्रे रामदास कदम यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांच्याकडे देण्याऐवजी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे सोपवली होती. मात्र आजच्या कदमांच्या वक्तव्याने या संपूर्ण प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.

Ramdas kadam-Uddhav Thackeray
सरकारी नोकरदार सोसायटी : फुटीर संचालकांना मतदानापासून रोखण्यासाठी हाणामारी

शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले की, मला उद्धव ठाकरे यांचा निरोप मिळालाय. मला १४ मे रोजीच्या शिवसेनेच्या सभेचे बोलावणं आलं आहे. मात्र, त्या सभेला मी उपस्थित राहणार नाही. त्यानंतर मात्र मी स्वतः उद्धव ठाकरे यांना भेटणार असल्याचं रामदास कदम यांनी सष्ट केलं. गावातल्या देवळात सप्ताहाचा कार्यक्रम असल्याने सभेला येणार नसल्याचा निरोप रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्याजवळ दिला आहे.

Ramdas kadam-Uddhav Thackeray
महेश कोठे यांच्या मोबाईलवर ‘राष्ट्रवादी पुन्हा’ ची हॅलो टोन

पालकमंत्री अनिल परब यांच्या विरोधात रामदास कदम यांनी रसद पुरवल्याच्या आरोप झाल्याने शिवसेनेचे वरिष्ठ त्यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. मात्र थेट उद्धव ठाकरे यांच्या सभेचं निमंत्रण आल्याचं रामदास कदम यांनी सष्ट केल्यानं आता याला वेगळं वळण लागलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com