अनिल परबांनी माझ्याविरोधात राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला बळ दिलं : बंडखोर योगेश कदमांचा घाणाघात

अनिल परब यांच्या त्रासामुळे मी बंड केले : योगेश कदम
Anil Parab- Yogesh Kadam
Anil Parab- Yogesh KadamSarkarnama

खेड : पालकमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी गेल्या सहा महिन्यांत माझे वेळोवेळी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पराभूत माजी आमदाराला शिवसेनेचे (Shivsena) पालकमंत्री असलेल्या परब यांच्याकडून निधी देण्यात आला. गेल्या मे महिन्यात याच माजी आमदाराला पाच कोटींचा निधी देण्यात आला. तसेच, दापोली नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावरच माझ्या तालुकाप्रमुखांसह सर्वच पदाधिकाऱ्‍यांना बाजूला सारून या ठिकाणी राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेल्या सर्व पदाधिकाऱ्‍यांची वर्णी लावण्यात आली. त्यामुळे पालकमंत्र्यांच्या त्रासाला कंटाळूनच मी बंड केले, असे दापोलीचे बंडखोर आमदार योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी सांगितले. (I rebelled because of Anil Parab's trouble: Yogesh Kadam)

एकनाथ शिंदे यांच्यासोबत दापोलीचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनीही बंड केले होते. बंडानंतर ते मतदारसंघात आल्यानंतर खेडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत कदम यांनी बंडामागची पार्श्वभूमी विशद केली. ते म्हणाले की, कदम म्हणाले की, गेल्या सहा महिन्यांच्या काळात पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाकडून माझे खच्चीकरण करण्याचा वेळोवेळी प्रयत्न झाला. दापोली व मंडणगड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेच्या स्थानिक आमदाराला डावलून पालकमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या माजी आमदारांकडे आणि नेहमीच शिवसेनेच्या विरोधात बोलणाऱ्‍या माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे निवडणुकीची सूत्रे दिली. त्यामुळे गेली सहा महिने माझ्यावर अन्याय झाला. खासदार संजय राऊत यांच्यामुळे नाराज आमदार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील दरी वाढत गेली, असा दावाही आमदार कदम यांनी केला.

Anil Parab- Yogesh Kadam
एकनाथ शिंदे गटाचे पंढरपुरात शक्तीप्रदर्शन; मुख्यमंत्र्यांसह दिग्गजांची हजेरी

मी आजही शिवसैनिकच आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे माझे आजही कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. परंतु रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब आणि पक्षप्रमुखांच्या आजूबाजूला असणाऱ्या चौकडीमुळे मला हा निर्णय घेणे भाग पडले, असेही आमदार योगेश कदम यांनी स्पष्ट केले.

Anil Parab- Yogesh Kadam
श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी आंदोलकांना सापडले रोख दीड कोटी रुपये !

अन्याय कानावर घालूनसुद्धा दखल घेतली नाही

आमदारांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुखांनी वेळ दिला नाही. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांच्या पराभूत उमेदवारांना देण्यात येणारे बळ, त्यामुळे शिवसैनिकांवर होणारा अन्याय या संदर्भात वेळोवेळी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर, खासदार संजय राऊत, अनिल देसाई, स्थानिक नेतृत्व खासदार विनायक राऊत यांच्या कानावर घालूनसुद्धा त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला, असे कदम म्हणाले.

Anil Parab- Yogesh Kadam
राज्यसभा निवडणुकीत खेळ बिघडवलेला आमदार शहा अन् नड्डांच्या भेटीला दिल्लीत

शिवसेना उमेदवार म्हणूनच लढणार

आगामी निवडणूक मी शिवसेना म्हणूनच लढणार आणि जिंकणार आहे, असा विश्‍वास आमदार कदम यांनी व्यक्त केला. या वेळी त्यांच्यासमवेत खेड तालुक्यातील शहर व ग्रामीण भागातील शिवसेनेचे पदाधिकारी, खेड पंचायत समितीचे माजी पंचायत समिती सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि खेड नगर पालिकेचे निवडक माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com