Gram Panchayat Results : वैभववाडीत ठाकरे गटाला जोरदार धक्का : राणेंनी गड राखला, तर 'नांदगाव'मध्ये...

Gram Pachayat Election : नांदगाव'मध्ये नितेश राणे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ग्रामस्थांना दम दिला होता.
Gram Pachayat Election
Gram Pachayat ElectionSarkarnama

Gram Pachayat Election : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यात 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर, या निवडणुका आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींची रंगीत तालीम म्हणूनच या निवडणुकीकडे पाहिले जात होते. यामध्ये आता भाजपान निर्विवाद वर्चस्व राखले आहे. 17 पैकी 14 ग्रामपंचायतीवर भाजपाची सत्ता आली.

Gram Pachayat Election
Gram panchayat Result : बाळासाहेब थोरातांच्या आनंदावर विरजण; विखेंनी केला 'करेक्ट' कार्यक्रम

भाजपा नेते व आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी तालुक्याच्या निवडणुका लढल्या. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचीच पूर्व तयारी या निमित्ताने झाली. नितेश राणे यांनी अगोदरच 17 पैकी 5 ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आणल्या होत्या, आज निकाल लागल्यानंतर आणखी 9 ग्रामपंचायती भाजपाने मिळवल्या असल्याचं स्पष्ट झालं. वैभववाडी तालुक्यात दोन ग्रामपंचायती ग्रामविकास पॅनलला मिळाल्या तर शिंदे गटाला एक ग्रामपंचायत मिळाली. या निकालाने वैभववाडी तालुक्यात भाजपाची ताकद जास्त असल्याचं स्पष्ट होत आहे.

दरम्यान, निवडणूक प्रचारादरम्यान नितेश राणे यांचे विधान वादग्रस्त ठरले होते. यावेळी नितेश राणे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ग्रामस्थांना दम दिला होता. सरपंच आपल्या मर्जीतील नसल्यास सरकारी निधीतून एक पैसाही मिळणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

Gram Pachayat Election
Gram Panchayat Results : राष्ट्रवादीच्या राजेश टोपेंना होम पिचवरच जोरदार धक्का!

नांदगाव येथील निवडणूक सभेत नितेश राणे म्हणाले की, ग्रामस्थांनी चुकूनही आपल्या मर्जीचा सरपंच निवडून दिला नाही तर शासनाचा निधी गावात पोहोचू देणार नाही आणि हे गाव विकासापासून दूरच राहील. या रॅलीच्या वेळी ग्रामस्थ व सरपंच उपस्थित होते. या वादग्रस्त विधानानंतरही राणे आणि भाजपने नांदगाव ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com