शिवसेनेला कोकणात मोठा धक्का; आणखी एक नेता शिंदेंच्या गळाला

शिवसेनेचे (Shivsena) माजी आमदार सदानंद चव्हाण (Sadanand Chavan) शिंदे गटात
Sadanand Chavan, Eknath Shinde
Sadanand Chavan, Eknath Shindesarkarnama

चिपळूण : शिवसेनेचे (ShivSena) माजी आमदार सदानंद चव्हाण (Sadanand Chavan) यांनी अखेर शिवबंधन तोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला पाठिंबा दिला आहे. आज त्यांनी आपल्या समर्थकांसह मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) उपस्थित होते.

चिपळूण विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा ते निवडून आले आहेत. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी 2004 मध्ये पक्ष सोडल्यानंतर चिपळूणमध्ये संपलेली शिवसेना मी उभी केली असा दावा ते वारंवार करत करतात. मागील विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर चव्हाण सक्रिय राजकारणापासून दूर होते.

Sadanand Chavan, Eknath Shinde
शिवसेनेचे आणखी २ खासदार अन् पाच आमदार शिंदे गटाच्या वाटेवर?

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर चिपळूण विधानसभा मतदारसंघावरील त्यांची पक्कड ढिली झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांचे दिवसेंदिवस वर्चस्व वाढत होते. मात्र, महाविकास आघाडीच्या प्रयोगामुळे ते शांत होते. संघटनेच्या बैठकांसाठी आणि कार्यक्रमासाठी ही त्यांना डावलले जात असल्यामुळे ते नाराज होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 40 आमदारांना घेऊन भाजपबरोबर हात मिळवनी केली. राज्याची धुरा हाती घेतल्यानंतर चिपळूणमध्ये शिवसेनिकांनी तातडीची बैठक घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केला होता. त्यावेळी चव्हाण संघटनेबरोबर होते. मात्र, नंतरच्या काळात चक्र फिरली आणि चव्हाण यांनी स्वतंत्र बैठक घेऊन पक्ष संघटनेवरील आपली नाराजी बोलून दाखवली होती. त्याचवेळी चव्हाण हे पक्षावर आणि नेतृत्वावर नाराज असून ते शिंदे गटात जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.

अखेर आज त्यांनी शिवबंधन तोडून शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याबरोबर उपजिल्हाप्रमुख शशिकांत चाळके उपतालुकाप्रमुख अभय सहस्त्रबुद्धे अनंत पवार युवक चे माजी तालुकाप्रमुख संदेश आयरे विभाग प्रमुख बळीराम चव्हाण, अनारीचे सदाभाऊ पवार आदी निवडक कार्यकर्ते उपस्थित होते.

सदानंद चव्हाण दहा वर्षे आमदार होते. पक्षाने त्यांच्या वर अन्याय केला असे काही घडले नाही. महाराष्ट्रमध्ये माजी आमदार भरपूर आहेत. सदानंद चव्हाण शिंदे गटात का गेले तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुक सचिन कदम यांनी सांगितले.

Sadanand Chavan, Eknath Shinde
उद्धवजी सांगायचे की, काँग्रेसच्या पालकमंत्र्यांसोबत सोबत काम करा; म्हणून...

गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. आगामी काळात चिपळूण मतदारसंघाचा विकास करण्याच्या दृष्टीने मी त्यांच्याशी चर्चा केली आहे. मतदारसंघासाठी ते निधी देणार असतील तर माझा त्यांना पाठिंबा आहे, असे मी त्यांच्याशी बोललो. पुढील दोन वर्षात चिपळूणसाठी जास्तीत जास्त निधी आणून विकास कामे करण्याचा मी प्रयत्न करणार आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in