
Ncp's Former MLA Sanjay Kadam : शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला कशेडी घाटात झालेल्या अपघातानंतर माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. मात्र, कदम यांच्या संशयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम (Sanjay Kadam) यांनी सडकून टीका करतानाच एक गौप्यस्फोट केला आहे.
दापोली विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. कदम म्हणाले, रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी स्वतःचे सख्खे भाऊ सदानंद कदम यांच्या मालकीचे साई रिसॉर्ट पाडण्यासाठी आरटीआय कार्यकर्ता प्रसाद कर्वे व भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांना हाताशी धरून अनिल परब यांच्या नावाखाली स्वतःच्या भावाचं नुकसान केलं आहे. त्यामुळे रामदास कदम हे काय आहेत हे जनतेला माहीत आहे, जे सख्ख्या भावाचे होऊ शकले नाहीत ते जनतेचे काय होणार अशी बोचरी टीका संजय कदम यांनी केली आहे.
गाढवावर फोटोची धिंड काढल्याप्रकरणी रामदास कदम यांनी आंदोलकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. त्याप्रकरणी एक टीव्ही चॅनलच्या पत्रकाराला अटक करण्यात आली. संजय कदम यांनी अटक वारंट रद्द करून घेतला. याच प्रकरणी आधी माफी मागणाऱ्या रामदास कदम यांनी आता अटक का करून घेतली, असा सवाल संजय कदम यांनी विचारला. रामदास कदम यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली आहे. आता डुप्टिकेट सेनेचे ते नेते आहेत अशी टीकाही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार कदम यांनी केली.
आमदार योगेश कदमांच्या अपघातामागं 'बंगाली बाबा' कनेक्शन ?
राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या आमदाराचा या अपघातामागे घातपाताचा संशय कदम कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी आता या प्रकरणात मोठं खळबळजनक विधान केलं आहे. यावेळी संजय कदम यांनी अप्रत्यक्षपणे रामदास कदम यांना लक्ष्य केले.
बंगाली बाबा कोणाच्या गाडीतून फिरतो, हे डुप्लिकेट सेनेचे नेते सांगू शकतात. बंगाली बाबाला शिधा न मिळाल्यामुळे घाटात कोणी काय कोंबडी-कुत्रं पुरलं, हे ते सांगू शकतात. एकदा डुप्लिकेट सेनेच्या नेत्याच्या घरातील कुत्रा मेला. तेव्हा खासदार अनंत गीते यांच्यावर आरोप करण्यात आला. बंगाली बाबाने त्यांना सांगितलं होतं की, तुमच्या नारळाच्या बागेत लिंबं-कोंबडं कापलेले आहे. त्यानंतर डुप्लिकेट सेनेचे नेते नारळाच्या बागेत गेले तेव्हा त्यांना तिथे लिंबू आणि कापलेले कोंबडे सापडले.
यानंतर याच बंगाली बाबाने एका भक्ताला सांगितले की, शिधा मिळवण्यासाठी आम्हीच त्याठिकाणी लिंबू आणि कोंबडं टाकलं. योगेश कदम यांच्या आताच्या अपघातापाठीही हेच कारण असावं असा सवाल संजय कदम यांनी उपस्थित केला आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.