मोठी बातमी : रत्नागिरी पंचायत समितीच्या माजी सभापती 10 दिवसांपासून बेपत्ता

Ratnagiri : माजी सभापती बेपत्ता असल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे
Swapnali Sawant
Swapnali Sawantsarkarnama

Swapnali Sawant : रत्नागिरी : रत्नागिरी (Ratnagiri) पंचायत समितीच्या माजी सभापती स्वप्नाली सावंत (Swapnali Sawant) 10 दिवसापासून बेपत्ता आहेत. या प्रकरणी संशयित म्हणून उपतालुकाप्रमुख असलेल्या त्यांच्या पतीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. स्वप्नाली सावंत यांचा मोबाईल पतीकडे मिळाल्याने संपूर्ण प्रकरणात त्यांच्यावर संशय अधिक बळावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल दिवसभर पोलिसांकडून (Police) रत्नागिरी शहराच्या आसपासच्या परिसरात श्वान पथकाच्या मदतीने शोध घेण्यात आला. 1 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास कोणालाही न सांगता सावंत अचानक बेपत्ता झाल्या. आता या प्रकरणात पतीची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. स्वप्नाली सावंत अचानक बेपत्ता झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Swapnali Sawant
मोठी बातमी : शिंदे गटाचा एक आमदार कमी होणार ? ; लता सोनवणे यांना दिलासा नाहीच !

स्वप्नाली सुकांत सावंत यांचे पती शिवसेनेचे उपतालुका प्रमुख आहेत. पोलिसांनी त्यांचे पती सुकांत सावंत यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मात्र, परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. या प्रकरणी लवकरच उलगडा होण्याची शक्यता, असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. स्वप्नाली सावंत या मागील 10 दिवसांपासून बेपत्ता आहे. याबाबत सुकांत सावंत यांनी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी स्वप्नाली यांचा शोध सुरू केला आहे.

Swapnali Sawant
Shivsena : आम्ही ओरिजनल, यायचं असेल तर ते पुढे येतील ; शिरसाटांसोबत उभे राहणे खैरेंनी टाळलेच..

सुत्रांच्या माहितीनुसार सुकांत सावंत व त्यांच्या पत्नी स्वप्नाली सावंत यांच्यात गेल्या काही वर्षांपासून कौटुंबिक वाद होते. अनेकवेळा हा वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर त्या अचानक बेपत्ता झाल्या आहेत. त्यानंतर पती सुकांत सावंत यांनी पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार स्थानिक पोलिस स्टेशनला केली. याच कौटुंबिक वादातून स्वप्नाली सावंत यांचा घातपात झाल्याची शंकाही वर्तविण्यात येत आहे. त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in