बदल्या थांबविण्यासाठी कर्मचाऱ्यांची राजकीय नेत्यांकडे धाव

वर्षांनुवर्षे तळ ठोकून बसलेल्या १७० कर्मचाऱ्यांच्या बदल्या नुकत्याच करण्यात आल्या आहेत.
बदल्या थांबविण्यासाठी कर्मचाऱ्यांची राजकीय नेत्यांकडे धाव
Thane Municipal CorporationSarkarnama

ठाणे : ठाणे महापालिकेच्या प्रभाग समितीत वर्षांनुवर्षे तळ ठोकून बसलेल्या १७० कर्मचाऱ्यांच्या बदल्या नुकत्याच करण्यात आल्या आहेत. मात्र, त्या कर्मचाऱ्यांनी बदल्या थांबविण्यात याव्यात, यासाठी राजकीय नेत्यांकडे धाव घेतल्याची माहिती समोर आली आहे. (Employees run to political leaders to stop transfers)

ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनादरम्यान अनधिकृत बांधकामांवरून विरोधकांनी रान उठविले होते. त्यात स्थायी समितीच्या बैठक असो अथवा सर्वसाधारण सभा या दोन्ही सभागृहांमध्ये सदस्यांकडून शहरातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा चर्चिला जात होता. वारंवार होणाऱ्या टीकेवरून पालिका आयुक्तांनी शहरात नव्याने उभे राहणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगाही उगारला.

Thane Municipal Corporation
मावळ गोळीबार झाला, तेव्हा शरद पवारांना जालियानवाला बाग हत्याकांड आठवले नाही?

आता आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी कर्मचाऱ्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत बदलीचे हत्यार उपसले आहे. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या विविध नऊ प्रभाग समितीतील तब्बल १७० कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, यामध्ये अतिक्रमण विभागात कार्यरत तब्बल ८५ कर्मचाऱ्यांच्या म्हणजेच १०० टक्के बदल्या केल्या. त्यानुसार सोमवारी आपल्या बदलीच्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. हजर न राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला होता. पण, त्यानंतरही सोमवारी महापालिका मुख्यालयात अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या बदल्या थांबविण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून आले.

Thane Municipal Corporation
शिवसेना, राष्ट्रवादीचे नेते माघारी फिरताच व्यापाऱ्यांनी दुकाने पुन्हा उघडली

येत्या सहा महिन्यांवर महापालिकेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. अशातच या कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्यामुळे कामकाजावर त्याचा परिणाम होईल. तसेच, कामेही रखडतील. त्यात त्या कर्मचाऱ्यांना नवीन ठिकाणी रुजू झाल्यानंतर तेथील कामकाज समजून घेण्यासाठी वेळ जाईल, आदी करणे देत झालेल्या बदल्या रोखण्यात याव्यात, यासाठी राजकीय नेत्यांकडे कर्मचाऱ्यांनी साकडे घालण्यास सुरुवात केली आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in