अकरा सरपंच, एका उपसरपंचास पदावरून काढून टाकले

कोकणचे विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी ही कारवाई केली; कोकण विभागातील सर्वांत मोठी कारवाई
अकरा सरपंच, एका उपसरपंचास पदावरून काढून टाकले
Sarpanch Sarkarnama

नवी मुंबई : कोकण (konkan) विभागातील एकूण ११ सरपंच, एका उपसरपंचावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम ३९ नुसार अधिकार व सदस्य पदावरून काढून टाकण्याची कारवाई कोकणचे विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी केली आहे. सरपंच, उपसरपंच व सदस्यांमार्फत होणारे गैरवर्तन, गैरव्यवहारांबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार कोकण विभागीय आयुक्तांनी सुनावणी घेतली होती. कोकण विभागांतर्गत ग्रामपंचायतींवर झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे. (Eleven sarpanches, one sub-sarpanch removed his post)

जिल्हा परिषदांनी सादर केलेल्या अहवालानुसार ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील एकूण ३५ सरपंच, उपसरपंच व सदस्यांबाबत तक्रारी असल्याने कोकण विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी १५ फेब्रुवारी २०२२ रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ मधील तरतुदीनुसार सुनावणी घेतली होती. या पैकी १६ प्रकरणांवर निर्णय घेण्यात आला आहे.

Sarpanch
अनिल कदम म्हणतात, आमच्या ओझरच्या समस्या सोडवा!

ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील न्हावे, पालघर जिल्ह्याच्या वाडा-खुपरी, रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील नादगाव, रोहा-कडसुरे, महाड-आंबिवली, पेण-रावे, रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर-साखरपा, राजापूर-आजिवली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी-शेर्ले, देवगड-कोटकामते, नारीग्रें या अकरा ग्रामपंचायतीचे सरपंचांचा समावेश आहे. पालघर जिल्‍ह्याच्या वसई तालुक्यातील मालजीपाडा येथील उपसरपंच हे दोषी आढळून आले.

Sarpanch
भाजप आमदार गोरेंना दुसरा धक्का; फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल

या सर्वांना त्यांच्या अधिकारपदावरून व सदस्य पदावरून काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली. तसेच, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ कलम ४० नुसार पालघर जिह्यातील वसई-कळंब व रायगड जिह्यातील सुधागड-अडुळसे या ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांना अपात्र ठरविण्यात आलेले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.