Eknath Shinde | कोकणी माणूस धनुष्यबाणासोबत : ठाकरेंची सभा म्हणजे आपटीबार ; शिंदेचा हल्लाबोल!

Kokan Sabha : सावरकरांच्या अपमानावर तुम्ही भूमिका का घेत नाही? शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

Kokan News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज (दि.19 मार्च) खेडमध्ये जाहीर सभा होत आहे . याआधी उद्धव ठाकरे यांची याच ठिकाणी सभा झाली होती. तेव्हा ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती.आता एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांचीही त्याच ठिकाणी आणि त्याच मैदानावर जाहीर सभा होत आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच सभेतून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केला.

यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले,"याच मैदाना त बाळासाहेबांची सभा येथे झाली. पण मागे झालेली सभा ती,आपटीबार सभा झाली. त्यांना उत्तर द्यायला आम्ही आलो नाही. तोच तोच थयथयाट होता सभेत, याला काय उत्तर देणार ?मुंबईत पण तोच खेळ सुरू आहे. काही बैठका सुरू आहेत. तेच टोमणे, तेच दोन तीन शब्द," अशा शब्दात शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.

Eknath Shinde
Imtiaz Jalil News : बाहेरून गुंडांना बोलावून अशांतता निर्माण केल्याबद्दल नेत्यांचे धन्यवाद...
Eknath Shinde
Ramdas Kadam : सिंगापूर, श्रीलंका, अमेरिकेला कुणाचे हॉटेल्स आहेत? रामदास कदमांनी भरसभेत सांगितलं...

"आजच्या सभेला जमलेला हा जनसागर आहे. काही लोकांना वाटत असेल की, कोकणच्या सभेत एवढी गर्दी कशी काय़? त्यांना सांगायचं आहे की, हे बाळासाहेबाचं प्रेम आहे. कोकण आणि कोकणचा माणूस बाळासाहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभा होता. कोकणी माणूस हा आजही बाळासाहेबांच्या विचारांसोबत, शिवसेनेसोबत, धनुष्यबाणासोबत आहेत. या क्रांतीमध्ये किती आमदार, किती खासदार, शिलेदार अशी किती संख्या पाहिली, हे नेहमी एकनाथ शिंदे सोबत राहिले," असे शिंदे म्हणाले.

ठआमदार योगशने सांगितलं हा उठाव जर झालाच नसता, तर काय परिस्थिती झाली असती. याचा विचार करण्याची आज गरज आहे. कोकणी माणूस हा फणसासाऱखा काटेरी आहे. पण तो आंब्यासारखा गोड असतो. कोकणी माणूस हा प्रेमळ आहे. शब्दाला जागणारा आहे. कोकणासोबत माझं जिव्ह्याळ्याचं नातं आहे," असे शिंदे म्हणाले.

शिंदे पुढे म्हणाले, "केवळ सत्ता मिळवण्यासाठी, मुख्यमंत्री पदासाठी धनुष्यबाण गहाण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडे गहाण ठेवलं. मात्र आम्ही शिवसेना वाचवण्याचं काम आम्ही केलं. निवडणूक आयोगानेही तो निर्णय झाला. विचारांशी बेईमीनी केली तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी. मात्र शिवसेना आम्ही वाचवली. "

Eknath Shinde
Eknath Shinde | कोकणी माणूस धनुष्यबाणासोबत : ठाकरेंची सभा म्हणजे आपटीबार ; शिंदेचा हल्लाबोल!

"बाळासाहेब ठाकरेंचं आशिर्वाद आपल्यासोबत आहे. अनेक नेत्यांनी ही शिवसेना वाढवली. पण तुम्ही सत्तेसाठी भूमिका बदलली. म्हणून आम्हाला उठाव करायला लागला. आपण वबाळासाहेबांचे विचारांचे वारस आपण आहोत," असे ही शिंदे म्हणाले.

"राहुल गांधी सावरकरांचा अपमान करतात, यावर तुम्ही कधीच काहीच बोलत नाही, हे कसलं हिंदुत्व आहे? सावरकरांचा अपमान आम्ही सहन करू शकत नाही. बाळासाहेब तुमचे वडील होते, हा इतिहास झाला, पण बाळासाहेब आमचे दैवत आहेत. ते तुम्हाला माफ करणार नाहीत," असा सवालाही शिंदेनी ठाकरेंना विचारला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in