Chiplun : शिवसेनेच्या गळ्याला नख लावण्याचे पाप करू नका : गीतेंचा चक्क मोदींनाच इशारा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी बंडखोरी Rebellion केल्यानंतर अनंत गीते Anant Geete सक्रीय झाले. त्यांनी महाराष्ट्रातील भाजप BJP नेत्यांवर टीका करण्याऐवजी थेट पंतप्रधान PM नरेंद मोदी Narendra Modi यांनाच लक्ष्य केले आहे.
Narendra Modi, Anant Geete
Narendra Modi, Anant Geetesarkarnama

चिपळूण : लोकसभा निवडणूकीत पराभूत झालेले शिवसेना नेते अनंत गीते पक्षात बंडखोरी झाल्यानंतर कमालीचे सक्रीय झाले आहेत. चिपळूण येथील निर्धार मेळाव्यात त्यांनी बंडखोरांचा समाचार घेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच आव्हान दिले. शिवसेनेच्या गळ्याला नख लावण्याचे पाप करू नये, असा इशारा गीतेंना पंतप्रधान मोदींना दिला. त्यानंतर सर्वांच्याच भुया उंचावल्या आहेत.

अनंत गीते 2014 च्या लोकसभा निवडणूकीत रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मंत्रीमंडळात शिवसेनेचा एकमेव मंत्री म्हणून काम करण्याची संधी गीते यांना मिळाली होती. केंद्रीय अवजड उद्योग खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी काम केले. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणूकीत त्यांचा परभाव झाल्यानंतर ते सक्रीय राजकारणातून अलिप्त होते.

Narendra Modi, Anant Geete
शरद पवारांवरील टीका भोवणार; अनंत गीते डेंजर झोनमध्ये

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या जाहिर कार्यक्रमातही ते दिसत नव्हते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर अनंत गीते सक्रीय झाले. त्यांनी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर टीका करण्याऐवजी थेट पंतप्रधान नरेंद मोदी यांनाच लक्ष्य केले आहे.

Narendra Modi, Anant Geete
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामुळे देश सशक्त बनला!

अत्यंत आक्रमकपणे ते भाजप विरोधी भाषण करत असल्यामुळे बंडखोरीनंतर गीते कमालीचा संतप्त झाल्याचे दिसत आहे. चिपळूण येथे झालेल्या निर्धार मेळाव्यात त्यांनी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव मुद्दाम घेत आहे. त्यांनाच इशारा देतोय, फक्त राजकीय फायद्यासाठी, सत्तेसाठी शिवसेनेसारख्या कडवट हिंदुत्ववादी संघटनेच्या गळ्याला नख लावण्याचे पाप तुम्ही करू नका.

Narendra Modi, Anant Geete
आमदार जयस्वालांच्या माणसांनी जिवे मारण्याची धमकी दिल्याचा भाजप नेत्याचा आरोप...

तुम्हाला कळत नाहीये की तुम्ही कोणते पाप करत आहात. शिवसेना ही केवळ महाराष्ट्राची गरज नसून अखंड हिंदू राष्ट्राची गरज आहे”, अशा शब्दांत गीतेंनी संताप व्यक्त केला. भाजप विरोधी बोलणाऱ्यांच्या विरोधात केंद्रीय यंत्रणांचा सासमेरा लागत असताना अनंत गीते मात्र थेट पंतप्रधान विरोधात सक्रीय झाल्याचे दिसत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in