आजही मला मुख्यमंत्री असल्याचे वाटते : देवेंद्र फडणवीस

गेली दोन वर्षे एक दिवसही घरी न थांबता मी जनतेत मिसळतो आहे.
आजही मला मुख्यमंत्री असल्याचे वाटते : देवेंद्र फडणवीस
devendra FadnavisSarkarnama

नवी मुंबई : कोणत्या पदावर आहे, हे महत्त्वाचे नाही. गेली दोन वर्षे एक दिवसही घरी न थांबता मी जनतेत मिसळतो आहे, सामान्य जनतेची कामे करतो आहे. आमची लोकोपयोगी कामे सुरूच आहेत, त्यामुळे मी आजही मुख्यमंत्री असल्याचे मला वाटते,’ असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत बोलताना केले. (Devendra Fadnavis said, I still think I am the Chief Minister)

बेलापूरच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या पुढाकाराने श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या माध्यमातून नवी मुंबईतील गरजू रुग्णांच्या आरोग्य सेवेसाठी सर्व सुविधांयुक्त रुग्णवाहिका व एपीएमसीमधील व्यापारी-माथाडी यांना टाकाऊमधून टिकाऊ तयार करण्यात आलेली सर्व सुविधांयुक्त प्रसाधनगृह बस यांचा लोकार्पण सोहळा माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी फडणवीस बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी मंत्री गणेश नाईक, आमदार रामेश पाटील, माजी आमदार व माथाडीचे नेते नरेन्द्र पाटील, नवी मुंबईचे भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ रामचंद्र घरत, माजी महापौर जयवंत सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.

दिवाळे गावातील ८० मासे विक्रेत्या महिलांना बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या प्रयत्नाने व्यवसाय परवाने प्राप्त झाले. प्राथमिक स्वरूपात त्यापैकी ५ मासेविक्री करणाऱ्या महिलांना माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते या परवान्याचे वाटप या वेळी करण्यात आले. माजी मंत्री गणेश नाईक यांनीही यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांच्या समाजाभिमुख कामाचे आपल्या भाषणातून कौतुक केले .

devendra Fadnavis
लहान मुलांसाठी खूषखबर; कोरोना लशीला मिळाला हिरवा कंदील

फडणवीस म्हणाले, माणूस कोणत्या पदावर आहे, हे महत्वाचे नाही. तो काय काम करतो, हे महत्वाचे आहे. मी गेली दोन वर्षे एकही दिवस घरी बसलेलो नाही. दररोज सामान्य जनतेची कामे करीत आहे. राज्यातील जनतेने मला एक दिवस असे जाणवू दिले नाही की मी मुख्यमंत्री नाही. त्यामुळे मला आजही मुख्यमंत्री असल्याचे वाटते. सध्या मी विरोधी पक्षनेता म्हणून काम करीत आहे. ज्या दिवशी आशीर्वाद मिळेल, त्या दिवशी पुन्हा येथे गोवर्धनीमध्ये नक्कीच येईन.

devendra Fadnavis
सदाभाऊ खोतांचा भाजपला दे धक्का! मोदी सरकारच्या विरोधात उतरले मैदानात

लोकोपयोगी उपक्रम सातत्याने हाती घेण्याचे काम आमदार मंदा म्हात्रे करत असतात. आपल्या घरातील आई व सून ही घराची काळजी घेत असते. पुरुष ज्या गोष्टींचा विचार करत नाहीत, तो विचार घरातील महिला करीत असते. एक ऊर्जावान स्त्री लोकप्रतिनिधि होते, त्यावेळी ती आपल्या मतदारसंघाची तसेच शहराची काळजी घेत असते. ते आम्हाला मंदा म्हात्रे यांच्यामध्ये पहायला मिळते. सातत्याने कुटुंबप्रमुखासारखी त्या मतदारसंघाची तसेच या शहराची काळजी घेत असतात, अशा शब्दांत फडणवीस यांनी आमदार म्हात्रे यांच्या कामाचे कौतुक केले.

Related Stories

No stories found.