'वेदांता-फॉक्सकॉन' प्रकल्प : केसरकर म्हणतात, आता बस झालं!

Deepak Kesarkar : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसाणं तुम्हाला शोभतं का?
Deepak kesarkar, uddhav thackeray Latest News
Deepak kesarkar, uddhav thackeray Latest Newssarkarnama

सिंधुदुर्ग : 'वेदांता-फॉक्सकॉन' हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात राज्यात गेल्याने राज्यातील राजकारणं चांगलच तापलं आहे. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

दरम्यान शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिवसेनेकडून सातत्याने केल्या जात असलेल्या या टीकेला प्रत्युत्तर दिले असून शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी वेदांता प्रकरणावरून राजकारण कारण बंद करावे,अशी टीका केली आहे. त्यांनी सिधुदुर्ग येथे माध्यमांशी संवाद साधला. (Deepak kesarkar, uddhav thackeray Latest News)

Deepak kesarkar, uddhav thackeray Latest News
उद्धव ठाकरेंकडे बोलायला चांगले वाक्य नसतील तर मला फोन करावा...

केसरकर म्हणाले की, एकीकडे प्रकल्पांना विरोध करता आणि दुसरीकडे प्रकल्प गेल्याची भाषा करता. हे तुम्हाला शोभत नाही. प्रकल्पाच्या नावावर भडक वक्तव्य करायचे आणि जनतेची डोके भडकवायची हे आता बंद करा, हे तुमचं राजकारण आता बस झालं. इथल्या मुलांना रोजगार हवा आहे. त्यामुळे पहिल्यांदा विरोध करण्याची भाषा बंद करा,अशा शब्दात केसरकरांनी शिवसेना नेत्यांना आणि उद्धव ठाकरे यांना सुनावले आहे.

पुढे केसरकर म्हणाले की, एकीकडे हिंदुत्वाचं राजकारण करायचं आणि दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसायचं हे तुम्हाला शोभतं का? जर शोभत असेल तर दसरा मेळाव्याला काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना बोलावणार का? असा खडा सवालही उपस्थित करत बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला तुम्ही तिलांजली दिली, अशा शब्दात केसरकरांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

Deepak kesarkar, uddhav thackeray Latest News
'ते'स्क्रीनशॅाट अन् रेकॅार्डिंग सोशल मीडियावर टाकले तर पंतप्रधानही तोंड दाखवू शकणार नाही...

दरम्यान, 'वेदांता-फॉक्सकॉन' हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात राज्यात गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारची चांगलीच गोची झाली असून यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सरकारवर जोरदार टीका करण्यात य़ेत आहे. यामुळे सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाच्या नेत्यांनीही पलटवार करायला सुरूवात केल्याने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होतांना दिसत आहे. सौम्य भाषेत टीका करणारे केसरकरही आता जोरदार टीका करत असल्याने त्यांच्या टीकेवर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे बघावं लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com