'वेदांत'मध्ये 'डील'? उदय सामंतांचा आरोप, चौकशीचा इशारा

Vedant Foxconn News : 'डीलच्या संदर्भात नारायण राणे आणि आशिष शेलार यांच्याकडे पुरावे'
Uday Samant|
Uday Samant|Sarkarnama

रत्नागिरी : ‘वेदांता’ प्रकल्प (Vedant Foxconn News) आता गुजरातमध्ये उभा केला जाणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर यावर राज्यातील राजकारण चांगलेतच तापले आहे. मागील तीन दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. विरोधकांनी सरकारला यासाठी जबाबदार धरले आहे. तर दुसरीकडे हा प्रकल्प मविआ सरकारच्या कार्यकाळातच गुजरातला गेल्याचे सत्ताधारी दावा करत आहेत. आता मात्र उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी वेदांता प्रकल्पाच्या संदर्भात 'डील' झाली आहे, असा खळबळजनक आरोप केला. याचे पुरावे लवकरच आपल्याकडे उपलब्ध होतील. पुराव्यानिशी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचा इशारा सामंत यांनी दिला. आज रत्नागिरी येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.(Latest Marathi News)

मागील सरकारच्या काळातील उद्योग खात्यामध्ये नेमके काय उद्योग झाले आहेत, याचा शोध आमचे सरकार घेईल. वेदांत प्रकल्पाच्या संदर्भात मागील सरकारच्या काळात डील झाल्याचा आरोप उद्योगमंत्री सामंत यांनी केला. डीलच्या संदर्भात केंद्रिय मंत्री उद्योगमंत्री नारायण राणे आणि आशिष शेलार यांच्याकडे पुरावे आहेत. पुरावे मिळताच या प्रकणाची चौकशी होणार, असे सामंत म्हणाले.

Uday Samant|
सामंतांसारख्या गद्दाराला निवडणुकीत ठेचल्याशिवाय राहायचे नाही : भास्कर जाधवांचा हल्लाबोल

यावेळी सामंत यांनी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला. आदित्य ठाकरें यांचे ठिकठिकाणी शिवसंवाद यात्रा आणि सभा सुरु आहेत. त्यांच्या सभांचा 400 खुर्च्यांमध्ये खेळ उरकत आहे. आपल्या आजूबाजूला असणारे किती निष्ठावंत आहेत, याचा त्यांनी अभ्यास करणे गरजेचे असल्याचे, उदय सामंत म्हणाले.

वेदांता हा प्रकल्प आपल्या राज्यातून गुजरातला गेला. राज्याच्या दृष्टीने हे हानीकारक आहे. मात्र आगामी काळात त्यापेक्षा मोठे प्रकल्प राज्यात कसे आणता येतील, याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत. उद्योग आणि तरुणांच्या हाताला काम यासाठी सगळे प्रयत्न केले जाणार, असे सामंत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com