शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला बंडखोरांच्या मदतीने पक्षाच्या नगरसेविकेचे चॅलेंज!

नगराध्यक्षपदावरून दापोलीच्या शिवसेनेत फूट : अधिकृत उमेदवाराविरोधात अर्ज दाखल
Dapoli Shivsena
Dapoli ShivsenaSarkarnama

दाभोळ : दापोली (Dapoli) नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. ४ फेब्रुवारी) दोन अर्ज दाखल झाले, त्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) आघाडीमध्ये आणि त्यातही शिवसेनेमध्ये (shivsena) फूट पडल्याचे स्पष्ट झाले. आघाडीच्या वतीने ममता मोरे यांनी, तर आघाडीतून निवडून आलेल्या शिवसेनेच्या शिवानी खानविलकर यांनी शिवसेवा विकास आघाडीच्या म्हणजे बंडखोर शिवसेना नगरसेवकांच्या मदतीने नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीत, त्यातही शिवसेनेत सारे काही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले. (Dapoli's Shiv Sena split on post of mayor : Application filed against official candidate)

दापोली नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची आघाडी झाली होती. शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांना बाजूला ठेवून शिवसेनेची सर्व सूत्रे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे पक्षाने दिली होती. त्यामुळे नाराज झालेल्या आमदार कदम यांच्या समर्थकांनी शिवविकास आघाडी स्थापन करून ही निवडणूक लढवली होती. मात्र, या आघाडीला निवडणुकीत यश आले नाही. या आघाडीचे केवळ दोनच नगरसेवक निवडून आले आहेत, तर भाजपचा एक नगरसेवक निवडून आला. शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचे १४ उमेदवार निवडून आले. यात शिवसेनेचे सहा, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ नगरसेवक निवडून आले आहेत.

Dapoli Shivsena
विजय शिवतारेंचा राजकीय वारस ठरला; ममता लांडेंकडे शिवसेनेची मोठी जबाबदारी!

शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीने अडीच-अडीच वर्षे नगराध्यक्षपद घेण्याचे ठरवले होते. त्यात पहिली अडीच वर्षे राष्ट्रवादीला तर पुढील अडीच वर्षे शिवसेनेला असे ठरवण्यात आले होते. मात्र, नगराध्यक्षपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलांसाठी पडल्याने पहिली संधी शिवसेनेला देण्यात आली. आज शिवसेनेच्या ममता मोरे यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज सादर केला. शिवाजीनगर प्रभागातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या शिवानी खानविलकर यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यावर शिवसेवा विकास आघाडीच्या कृपा घाग व प्रीती शिर्के यांनी सूचक व अनुमोदक म्हणून सह्या केल्या आहेत.

Dapoli Shivsena
एकनाथ खडसेंनी दुपारचे भोजन केले आपल्या मानसकन्येच्या घरी..

दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्याच उमेद्वारांविरोधात सेनेच्याच शिवानी खानविलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने दापोलीत खळबळ उडाली आहे. मात्र, राष्ट्रवादीतूनही नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल, यामुळे शिवानी खानविलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असावा, अशी चर्चा दापोलीत सुरू आहे. यासंदर्भात शिवानी खानविलकर यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही. जरी शिवानी खानविलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी सेनेच्याच ममता मोरे याच नगराध्यक्ष होतील, अशी परिस्थिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com