Cyrus Mistry Accident Update: मिस्त्रींच्या सहकारी पांडोळेंनी वाहतुकीच्या नियमांचे अनेकदा उल्लंघन केल्याचे उघड

4 सप्टेंबर 2022 रोजी सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाला होता.
Cyrus Mistry Accident Update
Cyrus Mistry Accident Update

Cyrus Mistry Accident Latest news Update : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष दिवंगत सायरस मिस्त्री यांच्या अपघात प्रकरणी एक नवी माहिती समोर आली आहे. मिस्त्री यांच्यासोबत कारमध्ये असलेल्या डॉ. अनहिता पांडोळे यांनी सीटबेल्ट नियमानुसार लावला नसल्याची माहिती पालघर पोलिसांनी दिली आहे. इतकेच नव्हे तर पांडोळे यांनी त्यापुर्वीही अनेकदा वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्याचेही निदर्शनास आले आहे.

अपघात झाला तेव्हा अनाहिता पंडोले यादेखील यावेळी मिस्त्री यांच्यासोबत कारमध्ये होत्या. गेल्या वर्षी 4 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र पोलिसांनी एका अपघाताप्रकरणी पांडोळे यांच्याविरुद्ध निष्काळजीपणा आणि बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता.

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, वाहतुक विभागाने पांडोळे यांच्याविरोधात २०२१ मध्ये नऊ आणि २०२२मध्ये दोन चलान फाडले होते. त्यामुळे अनाहिता यांच्याविरोधात चार्जशीटमध्ये या चलानांचाही उल्लेख केला जाईल. या आठवड्यात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाईल, असे पालघर पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे.

4 सप्टेंबर 2022 रोजी सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा अपघाती मृत्यू झाला होता. ते गुजरातवरून मुंबईच्या दिशेने येत असतांना पालघर येथील चोरोटी येथे त्यांच्या गाडीचा अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. सायरस मिस्त्री हे गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येत होते. ते पालघरमधील डहाणू तालूक्यातील चारोटी या गावातील चारोटी नाक्यावर त्यांची चारचाकी दुभाजकाला धडकली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

सायरस मिस्त्री हे प्रसिद्ध उद्योगपती पल्लोनजी शापूरजी यांचे धाकटे पुत्र होते. त्यांची 2019 साली सायरस मिस्त्री यांनी टाचा समूहाच्या प्रमुखपाची सुत्रे सांभाळली होती. मिस्त्री यांचा जन्म मुंबईत पारसी कुंटुंबात झाला होता. पल्लोनजी मिस्त्रींचे ते धाकटे सुपूत्र होते. लंडन बिझनेस स्कूलमध्ये त्यांच शिक्षण झाल तर लंडनच्या इंपीरियल कॉलेजमध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण झालं केले होते.

सायरस मिस्त्री ज्या कारमध्ये प्रवास करत होते ती मर्सिडीज बेंझ GLC 220 D 4MATIC होती. अपघातानंतर कारमधील सेफ्टी फीचर्सवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यानंतर मंगळवारी मर्सिडीज बेंझ बनवणाऱ्या जर्मन कंपनीने अपघातस्थळी भेट दिली. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अपघातग्रस्त कारची संपूर्ण माहिती गोळा करत याचा डेटा आधी पुण्यात आणि नंतर जर्मनीला पाठवला जाणार असल्याचं सांगितलं होतं. हा डेटा जर्मनीमध्ये डीकोड केला जाईल, त्यानंतर कारच्या तांत्रिक डेटाची माहिती उपलब्ध होईल. असही त्यांनी सांगितलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com