राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांसह १५ जणांवर गुन्हे दाखल

ज्या ठिकाणी बंद करण्यासाठी दमदाटी करण्यात आली, त्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत
NCP
NCPSarkarnama

नालासोपारा-वसई : महाविकास आघाडीच्या ‘महाराष्ट्र बंद’ला वसई, विरार, नालासोपाऱ्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. वसई रोड रेल्वेस्थानक परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी भाजप सरकारविरोधात घोषणाबाजी करीत तीव्र आंदोलन छेडले. माणिकपूर पोलिसांनी या सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांच्यासह अन्य १५ जणांवर गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भाऊसाहेब आहेर यांनी सांगितले. (Crimes filed against 15 persons including NCP district president)

वसई गावात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी व्यापारी, नागरिकाना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. वसई पोलिसांनी वर्तकसह अन्य सहा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल न करता सोडून दिले. पण, राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक होऊन आंदोलन छेडत दमदाटी करत व्यापाऱ्यांना दुकान बंद करण्यास भाग पाडले. या प्रकरणी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. आजच्या बंदमध्ये वसई विरार नालासोपारा शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी बंद मध्ये सहभागी होऊन आपला निषेध व्यक्त केला आहे. ज्या ठिकाणी बंद करण्यासाठी दमदाटी करण्यात आली, त्या कार्यकर्त्यांवर आम्ही गुन्हे दाखल केले आहेत, असे मीरा-भाईंदर, वसई विरार परिमंडळ २ चे पोलिस उपायुक्त संजय पाटील यांनी सांगितले.

NCP
उपाध्यक्षपदाची खुर्ची संजय पाटलांच्या काकांना मिळणार की सत्यजित देशमुखांच्या?

उल्हासनगरात काँग्रेस पदाधिकाऱ्यांना अटक

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या भाजप सरकारमधील केंद्रीय गृहराज्यमंत्र्याच्या मुलाच्या विरोधात महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये बाईक रॅली काढून निदर्शने करणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना मध्यवर्ती पोलिसांनी अटक करून त्यांची सुटका केली. अटक आणि सुटका करण्यात आलेल्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रोहित साळवे, ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके आदी पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.

NCP
छापेमारीमुळे काही मोठी नावे अडचणीत आल्यानेच ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला

वसईत भाजपकडून व्यापाऱ्यांना पुष्पगुच्छ

वसई-विरारमध्ये भाजपने अनोख्या पद्धतीने उत्तर देत बंदचा निषेध नोंदविला. विरार येथे ज्या व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू ठेवली, त्यांचा भाजपच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. राज्यातही अनेक मोठ्या घटना घडल्या आहेत. त्यात शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली, त्या वेळी मात्र महाराष्ट्र बंदची हाक का नाही दिली, असा प्रश्न या वेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. ‘बंद’ हे केवळ राजकारण असून कोरोना काळात अनेकांचे हाल झाले आहेत. त्याचा विचार केला गेला नाही. त्यामुळे या बंदचा निषेध अनोख्या पद्धतीने करण्यात आल्याचे या वेळी सांगण्यात आले. याप्रसंगी विरार भाजप महिला मोर्चा अध्यक्षा अर्पिता पडवळ, प्रणेश शुक्ला, साईनाथ गवळी, संदीप शिंदे आदी सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com