महाविकास आघाडीची सत्ता की राणे वचपा काढणार? सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा निकाल

19 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत 39 दिग्गज उमेदवार रिंगणात आहेत.
Sindhudurg District Bank

Sindhudurg District Bank

sarkarnama

सिंधुदुर्ग : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा (Sindhudurg District Bank Election) बँक निवडणुकीच्या मत मोजणीला सुरुवात झाली आहे. भाजपचे (BJP) सिद्धिविनायक पॅनेलच आणि महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सहकार समृद्धी पॅनेल यांच्यात ही निवडणूक होणार आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 19 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत 39 दिग्गज उमेदवार रिंगणात आहेत. 981 मतदारांपैकी 968 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे 98.76 टक्के मतदान झाले आहे. ३ फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. बँकेचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनलचे प्रमुख सतीश सावंत मतमोजणी केंद्रावर दाखल झाले आहेत. थोड्यात वेळात पहिला कल हाती येणार आहे.

<div class="paragraphs"><p>Sindhudurg District Bank</p></div>
जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आणि झेडपी अध्यक्षांमध्ये मोबाईलवरून खडाजंगी!

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बँक पंचवार्षिक निवडणुकीसाठी आठही तालुका तहसील कार्यालयात मतदान केंद्र ठेवण्यात आली होती. मतदानासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोन्ही बाजूकडून निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही पॅनेलने तगडे उमेदवार देत एकमेकांसमोर तगडे आवाहन उभे केले आहे. मतमोजणी केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणामुळे ही निवडणूक जास्तच चेर्चेत आली होती.

<div class="paragraphs"><p>Sindhudurg District Bank</p></div>
कोल्हापूरच्या सतेज पाटलांनी केले सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेसाठी मतदान!

या निवडणुकीत आठ तालुका मतदार संघातून आठ संचालक निवडून द्यायचे आहेत. यासाठी कणकवलीमध्ये शिवसेनेकडून विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत विरोधात भाजपचे विठ्ठल देसाई, देवगड तालुक्यात महाविकास आघाडीकडून अपक्ष अविनाश माणगांवकर विरुद्ध भाजपचे प्रकाश बोडस, वैभववाडी तालुक्यात सेनेचे दिगंबर पाटील विरुद्ध भाजपचे मोहन रावराणे, मालवण तालुक्यात राष्ट्रवादीचे व्हिक्टर डांटस विरुद्ध भाजपचे कमलाकांत कुबल, कुडाळ तालुक्यात काँग्रेसचे विद्याप्रसाद बांदेकर विरुद्ध भाजपचे प्रकाश मोर्ये व भाजप बंडखोर सुभाष मंडव, वेंगुर्ले तालुक्यात काँग्रेसचे विलास गावडे विरुद्ध भाजपचे मनीष दळवी, सावंतवाडी शिवसेनेचे विद्याधर परब विरुद्ध भाजपचे गुरुनाथ पेडणेकर, दोडामार्ग सेनेचे गणपत देसाई विरुद्ध भाजपचे प्रकाश गवस यांच्यात लढत झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com