Barsu Refinery News : आंदोलन चिघळलं : विनायक राऊत ताब्यात ; पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या..

MP Vinayak Raut in barsu refinery : आंदोलकांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना रस्त्यात अडवले.
Protest against Barsu Refinery
Protest against Barsu RefinerySarkarnama

MP Vinayak Raut in police custody barsu refinery News : काही दिवसांपासून रिफायनरी प्रकल्पावरुन राज्यातील राजकारण पेटलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचा या प्रकल्पाला विरोध आहे.

अशातच बारसूची जागा उद्धव ठाकरे यांनीच सुचवल्याचं पत्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रसारमाध्यामांना दाखवत ठाकरेंच्या भूमिकेवर टीका केली. त्यानंतर आता ठाकरेंनी पर्यायी जागा का सुचवली याबाबत ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी खुलासा केला आहे.

स्थानिक खासदार विनायक राऊत हे आंदोलकांना भेटायला जात होते, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईवरुन राऊत हे बारसूकडे रवाना होताना पोलिसांनी त्यांना तेथे न जाण्यास सांगितले होते, मात्र विनायक राऊत हे आपल्या भूमिकेवर ठाम होते. ते आंदोलकांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना रस्त्यात अडवले. त्यावेळी राऊतांनी रस्त्यातच ठाण मांडले. त्यानंतर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना बारसूच्या माळरानावर ताब्यात घेण्यात आले आहे.

दोन आंदोलक किरकोळ जखमी..

आंदोलक आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी त्यांना पांगविण्यास सुरवात केली आहे. राऊतांसह सात ते आठ आंदोलकांना ताब्यात घेतल्याचे समजते. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली. काही महिलांना पोलिसांना अडवलं आहे. पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. यात दोन-तीन आंदोलक किरकोळ जखमी झाले आहेत.

"प्रकल्पाला विरोध का आहे हे समजवून घेऊ. मातीचे परिक्षण झाले म्हणजे आज उद्या प्रकल्प येणार नाही. स्थानिकांचा विरोध कमी होत असताना काही लोकांनी पक्षीय राजकारणाला स्थानिकांचे रुप देऊन हे आंदोलन केले आहे," असे स्पष्टीकरण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.

अश्रुधुराचा वापर नाही : सामंत

"पोलिसांनीअश्रुधुराचा वापर केलेला नाही. आंदोलनकर्त्यांनी जो वणवा लावण्याचा प्रयत्न केला आहे तो विझवताना तो धूर येत आहे, असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे.

चर्चेसाठी तयार आहोत

"हे स्थानिकांचे आंदोलन नाही. मला हात जोडून सर्वांना विनंती करायची आहे की तुमच्या मताच्या राजकारणासाठी शेतकऱ्यांची डोकी भडकवू नका. माझी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी मला सांगितले आहे की आपण चर्चेसाठी तयार आहोत," असे सामंत म्हणाले.

Protest against Barsu Refinery
Bihar News : JDU नेता कैलाश महतो यांचा खून ; दुचाकीस्वारांकडून गोळीबार..

बारसू सोलगाव (जि. रत्नागिरी) येथील प्रस्तावित रिफायनरीवरुन राजकारण पेटलं आहे. स्थानिक नागरिकांना या प्रकल्पाला विरोध केला आहे. तर सत्ताधारी शिंदे-भाजप सरकारने या ठिकाणी माती परीक्षणास सुरवात केली आहे.

याला विरोध करण्यासाठी स्थानिकांनी आंदोलन सुरु केले आहे, महिला आंदोलक रस्त्यावर उतरल्या आहेत. पोलिसांनी आंदोलनाला विरोध करणाऱ्यांना अटक केली आहे. तर काही ग्रामस्थांना ताब्यात घेतले आहे. आता पोलिसांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना नोटीसा बजावल्या आहेत.

खासदार विनायक राऊत यांच्या बारसू दौऱ्याच्या अनुषंगाने उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना नोटीसा बजवण्यात आल्या आहेत. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांना नोटीस बजवण्यात आली आहे. तुमच्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये कायदा सुव्यवस्था बिघडल्यास आपणावर कारवाई होईल, असे बजावण्यात आले आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 149 प्रमाणे ही नोटीस देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com