काँग्रेसच्या बड्या नेत्याच्या हाती शिवबंधन; उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

त्यांनी २०१४ मध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची निवडणूकही लढवली होती.
Bala Gawde joins Shiv Sena
Bala Gawde joins Shiv SenaSarkarnama

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे (Bala Gawde) यांनी आज (ता. २३ जुलै) अखेर शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते ‘मातोश्री’वर जाऊन शिवबंधन बांधले. दोन दिवसांपूर्वी त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. गावडे यांच्यासोबत काही पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेमध्ये प्रवेश केला. याप्रसंगी खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख संजय पडते, सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ उपस्थित होते. (Congress leader Bala Gawde joins Shiv Sena)

गावडे यांनी २००५ मध्ये नारायण राणे यांच्याबरोबर शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला होता. त्यानंतर काँग्रेसमध्ये असताना त्यांनी जिल्हा परिषद बांधकाम सभापती, पंचायत समिती सभापती अशी पदे भूषविली होती. त्यांनी २०१४ मध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची निवडणूकही लढवली होती. मात्र, राणेंनी काँग्रेसला रामराम केल्यानंतर गावडे हे काँग्रेसमध्येच राहिले होते. काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष पद त्यांनी भूषविले.

Bala Gawde joins Shiv Sena
एकनाथ शिंदेंकडून मंगेश चिवटेंना ‘त्या’ कामगिरीची बक्षिसी!

वर्षभरापूर्वी त्यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. पक्ष संघटना वाढविण्याबरोबरच विविध आंदोलने यशस्वी करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. एक कुशल संघटक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, काही कारणास्तव अलीकडे ते पक्षात नाराज होते. त्यातच दोन दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला होता. तर त्यांचे चिरंजीव कौस्तुभ गावडे यांनीही एनएसयूआय जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्यांच्या निकटवर्तीयांकडून याबाबत दुजोरा देण्यात आला होता. परंतु गावडे यांनी याबाबत कुठेही स्पष्टता केली नव्हती. आज अखेर त्यांनी काही निवडक कार्यकर्त्यांसमवेत ‘मातोश्री’वर जाऊन खासदार राऊत यांच्या उपस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले.

Bala Gawde joins Shiv Sena
'उद्धव ठाकरेंनी विधानसभेत जुन्या जखमांवरील खपल्या काढण्याची गरज नव्हती'

इतर कार्यकर्त्यांनी केला प्रवेश

या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, युवा सेनेचे गुणाजी गावडे आदी उपस्थित होते. तर प्रवेशकर्त्यांमध्ये कौस्तुभ गावडे, सच्चिदानंद बुगडे, संदीप कोठावळे, किरण गावडे, दोडामार्ग तालुक्यातून वैभव सुतार, अवी सावंत, शुभम धर्णे, राजन झोरे, सचिन धर्णे आदींनी प्रवेश केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in