भाजप रायगड जिल्हाध्यक्ष मोहितेंविरोधात महिलेची तक्रार; घटस्फोट झाल्याचे खोटे सांगून केले लग्न

माझ्यावर अत्याचार करण्यात आले. माझा व्हिडिओ व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकीही देण्यात आली.
Mangesh Mohite
Mangesh MohiteSarkarnama

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे (BJP) सोलापूरचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख (Shrikant deshmukh) यांचे बेडरुममधील व्हिडिओ प्रकरण ताजे असतानाच आता सोलापुरातील एका महिलेने भाजपचे रायगड (Raigad) जिल्हाध्यक्ष महेश मोहिते (Mahesh Mohite) यांच्या विरोधात केलेल्या तक्रार प्रकरणात न्याय मिळावा, अशी मागणी राज्य महिला आयोगाकडे (Women's Commission) केली आहे. (Complaint against BJP's Raigad District President Mahesh Mohite to Women's Commission)

विवाहित असूनही घटस्फोट झाल्याचे भासवून या महिलेस महेश मोहिते यांनी संबंधित महिलेस तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीपासून घटस्फोट घ्यायला लावून या महिलेसोबत लग्न केले, तसेच या महिलेपासून त्यांना एक मुलगीदेखील आहे. मात्र, तिसऱ्या अपत्यामुळे राजकीय करिअर संकटात आल्यानंतर महेश मोहिते यांनी मुलीची ओळख लपवून ठेवण्यासाठी संबंधित महिलेवर दबाव आणण्यास सुरुवात केली, त्यातून धमक्याही दिल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे.

Mangesh Mohite
आढळरावांचा शिवसेनेला अखेर ‘जय महाराष्ट्र’; हकालपट्टीच्या अपमानाचे उट्टे काढले!

नवी मुंबई पोलिस आयुक्तांकडे सोलापुरातील या महिलेने ६ मे २०२२ रोजी तक्रार केली होती. या तक्रारीत त्यांनी म्हटले होते की, माझा २०१५ मध्ये अलिबाग (जि. रायगड) येथील भाजप जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांच्याशी विवाह झाला होता. त्यांनी आमच्या अनेक भेटींमध्ये त्यांचा पत्नीपासून घटस्फोट झाल्याचे दाखविले होते. त्यामुळे मी त्यांच्यासोबत ६ ऑक्टोबर २०१५ रोजी नवी मुंबईतील गावदेवी मंदिरात विवाह केला होता. त्यानंतर त्यांच्याकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

Mangesh Mohite
‘मातोश्री’च्या त्या निर्णयामुळे आढळरावांनी २००४ प्रमाणे उभारला बंडाचा झेंडा!

तक्रारीत त्या महिलेने म्हटले आहे की, माझ्यावर अत्याचार करण्यात आले. माझा व्हिडिओ व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकीही देण्यात आली. मला आणि माझ्या कुटुंबीयांना त्यांच्याकडून धोका आहे. या महिलेने राज्य महिला आयोगाकडे एप्रिल महिन्यात तक्रार केली होती.

Mangesh Mohite
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुखांवर पुण्यात गुन्हा दाखल

दरम्यान, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष देशमुख यांचे प्रकरण समोर आल्यानंतर या महिलेने रविवारी (ता. १७ जुलै) पुन्हा महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. आपल्याला न्याय मिळावा. रायगड आणि सोलापूर पोलिसांकडे दिलेल्या तक्रारींबाबत काय झाले, याबद्दल कळवावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच, या रायगड जिल्हाध्यक्षाचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चांगले संबंध असल्याचेसुद्धा या महिलेने सांगितले आहे, तसेच या वरिष्ठ नेत्यांमध्ये या महिलेने किरीट सोमय्यांपासून ते फडणवीस यांच्यापर्यंत सगळ्यांचीच नावे घेतली आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in