आमदार निकम, डॉ चोरगेंच्या विजयासह रत्नागिरी जिल्हा बॅंकेवर सहकारचे वर्चस्व; बाईत पितापुत्रांचा पराभव

सहकार पॅनेलविरोधात दंड थोपटणारे लांजाचे अजित यशवंतराव दुग्धोत्पादन मतदारसंघातून, तर भाजपचे लांजा तालुकाध्यक्ष महेश ऊर्फ मुन्ना खामकर हे विजयी झाले.
Ratnagiri District Co-operative Bank
Ratnagiri District Co-operative BankSarkarnama

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ratnagiri District Bank) २१ जागांपैकी १४ जागा सहकार पॅनेलने बिनविरोध जिंकल्या होत्या. उर्वरीत सात जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सहकार पॅनेलने पाच जागांवर विजय मिळविला खरा मात्र विद्यमान दोन संचालकांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. पण बिनविरोध १४ आणि जिंकलेल्या ५ जागांसह १९ जागा मिळवित सर्वपक्षीय सहकार पॅनेलने बॅंक ताब्यात ठेवण्यात यश मिळविले आहे. सहकार पॅनेलविरोधात दंड थोपटणारे लांजाचे अजित यशवंतराव दुग्धोत्पादन मतदारसंघातून, तर भाजपचे (bjp) लांजा तालुकाध्यक्ष महेश ऊर्फ मुन्ना खामकर हे विजयी झाले. (Co-operation panel dominates Ratnagiri District Co-operative Bank)

सहकार पॅनेलच्या १४ जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यात आणखी पाच जागांची भर पडल्याने १९ जागा मिळाल्या आहेत. त्यात डॉ. तानाजीराव चोरगे, बाबाजी जाधव, आमदार शेखर निकम, सुधीर कालेकर, जयवंत जालगावकर, रमेश दळवी, अ‍ॅड. दीपक पटवर्धन, महादेव सप्रे, मधुकर टिळेकर, अमजद बोरकर, राजेंद्र सुर्वे, रामचंद्र गराटे, नेहा माने, दिशा दाभोळकर यांचा समावेश आहे.

Ratnagiri District Co-operative Bank
क्रॉस व्होटिंगची धाकधूक आणि नेतेमंडळींचे मतदान केंद्रांवर दिवसभर ठाण!

येथील नगर वाचनालयात जिल्हा उपनिबंधक तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सोपान शिंदे, निवडणूक निरीक्षक तथा उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी झाली. दोन तासांत निकाल जाहीर झाला. जिल्हास्तरीय विमुक्त जाती, भटक्या जमाती मतदारसंघातून सहकार पॅनेलचे सुरेश मारुती कांबळे यांनी ६९२ मते घेत सचिन चंद्रकांत बाईत यांचा पराभव केला. बाईत यांना १६४ मते मिळाली. मजूर संस्था मतदारसंघातून सहकारचे दिनकर गणपत मोहिते ४८ मते घेत विजयी झाले. त्यांच्या विरोधातील राकेश श्रीपत जाधव यांना ४५ मते मिळाली. मोहिते अवघ्या तीन मतांनी विजयी झाले. नागरी पतसंस्था मतदारसंघासाठी सहकारच्या संजय राजाराम रेडीज यांना अ‍ॅड. सुजित झिमण यांनी चांगलेच झुंजविले. रेडीज यांना ६६, तर झिमण यांना ५६ मते मिळाली. अवघ्या १० मतांनी रेडीज निवडून आले.

Ratnagiri District Co-operative Bank
झेडपीतील कारभारी बदलास पुन्हा ब्रेक; संजयकाकांसह इच्छुकांच्या भूमिकेकडे लक्ष!

सर्वांची उत्सुकता लागलेल्या दुग्धसंस्था मतदारसंघातून सहकारचे विद्यमान संचालक गणेश यशवंत लाखण यांचा अजित यशवंतराव यांनी पराभव केला. लाखण यांना १० मते, तर यशवंतराव यांना २५ मते मिळाली. रत्नागिरी तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे गजानन पाटील यांना ३३, तर प्रल्हाद महादेव शेट्ये यांना आठ मते मिळाली.

लांजा तालुका मतदारसंघातील निकाल धक्कादायक ठरला. सहकार पॅनेलचे आदेश दत्तात्रेय आंबोळकर यांना भाजपचे तालुकाध्यक्ष महेश रवींद्र खामकर यांच्याकडून पराभव पत्कारावा लागला. आंबोळकर यांना १६, तर विजयी खामकर यांना १८ मते मिळाली. माजी संचालक सुरेश विष्णू ऊर्फ भाई साळुंखे यांच्या प्रयत्नांमुळे निवडून आल्याचे खामकर यांनी सांगितले. गुहागर तालुका मतदारसंघातून सहकार पॅनेलचे अनिल विठ्ठल जोशी यांना १३, तर चंद्रकांत धोंडू बाईत यांना आठ मते मिळाली. जोशी पाच मतांनी निवडून आले. बँकेचे ज्येष्ठ संचालक चंद्रकांत बाईत, त्यांचे सुपुत्र तथा शिवसेना गुहागर तालुकाप्रमुख सचिन बाईत या दोघांना पराभव पत्करावा लागला.

Ratnagiri District Co-operative Bank
जयंतराव, विश्वजित कदमांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सांगली बँकेसाठी 85 टक्के मतदान

प्रत्येक मतदाराने विश्‍वास दिल्यानेच या निवडणुकीत यश मिळविता आले. या मतदारसंघात नव्याने काम करताना सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे, असे सहकार पॅनेलचे विजयी उमेदवार अजित यशवंतराव यांनी सांगितले. जिल्हा बँकेची निवडणूक प्रक्रिया झालेली आहे. त्यामुळे सर्व संचालक एकत्र येऊन बँकेचा कारभार चांगल्या पद्धतीने हाकण्यासाठी सज्ज झाले आहेत, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी विजयानंतर नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com